Smriti Irani Dainik Gomantak
मनोरंजन

Smriti Irani: '...असे राजकीय पक्ष दहशतवाद्यांच्या पाठीशी', केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी का दिली अशी प्रतिक्रिया

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी नुकताच 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट पाहिला असुन विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे.

दैनिक गोमन्तक

Smriti Irani: 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट केवळ संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनला नाही, तर त्यावरून बरेच राजकारणही सुरू आहे. एकीकडे भाजप याला दहशतवादाचा पर्दाफाश करणारा चित्रपट म्हणत आहे, तर दुसरीकडे विरोधक याला राजकीय अजेंडा म्हणत आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहिला असुन आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे.

  • स्मृती इराणींची प्रतिक्रिया

चित्रपट पाहिल्यानंतर स्मृती इराणी यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला. या चित्रपटाला विरोध करणारे राजकीय पक्ष दहशतवाद्यांच्या पाठीशी उभे असल्याचे स्मृती इराणी म्हणाल्या. एक आई असल्यामुळे मी हे पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकते. 

आपल्या देशातील नागरिकांवर होणारे अत्याचार विसरणारे असे राजकीय पक्ष अशा दहशतवादी कारस्थानांच्या पाठीशी उभे राहिलेले मानले जाऊ शकतात. स्मृती इराणीं या हा चित्रपट पाहण्यासाठी दिल्लीतील चाणक्यपुरीच्या थिएटरमध्ये पोहोचल्या होत्या. चित्रपट पाहिल्यानंतर त्याचा एक व्हिडिओ आता सोशल मिडियावर समोर आला आहे.

तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये जिथे या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे, तर दुसरीकडे उत्तराखंड आणि यूपीमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. एक गट या चित्रपटाविरोधात (Movie) आंदोलन करत असताना, दुसरा गट या चित्रपटाला दहशतवादी कटाचा पर्दाफाश म्हणत आहे.

  •  चित्रपटावरून वाद सुरु

खरं तर, जेव्हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला तेव्हा असा दावा करण्यात आला होता की केरळमधील सुमारे 32 हजार महिलांचे इस्लामिक कट्टरवाद्यांनी धर्मांतर करून जिहादसाठी वापरले होते. 

पण नंतर ट्रेलरच्या वादानंतर 32 हजार महिला बदलून फक्त तीन महिला करण्यात आल्या तर आता हा चित्रपट मोठ्या पडद्यावर आला असून, प्रत्येकजण त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्तही करण्यात आला आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केले आहे आणि त्यात अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी यांनी आपला दमदार अभिनय दाखवला आहे.   

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT