The Kerala Story Dainik Gomantak
मनोरंजन

The Kerala Story चा ट्रेलर रिलीज, केरळमधील मुलींना लव्ह जिहाद...

The Kerala Story Trailer: गेल्या वर्षी टीझर रिलीज झाल्याने वादात सापडलेल्या 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज करण्यात आला आहे.

Manish Jadhav

The Kerala Story Trailer: गेल्या वर्षी टीझर रिलीज झाल्याने वादात सापडलेल्या 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज करण्यात आला आहे.

हा चित्रपट 5 मे रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अदा शर्मा मुख्य भूमिकेत आहे. केरळ राज्यातील मुली लव्ह जिहादला बळी पडून ISIS मध्ये सामील झाल्याची धक्कादायक कहाणी या चित्रपटात मांडण्यात आली आहेत.

नोव्हेंबर 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या टीझरमध्ये अदा शर्मा हे सांगताना दिसली होती की, इस्लामिक देशांमध्ये परिचारिका म्हणून काम करण्यासाठी गेलेल्या केरळमधील (Kerala) 32,000 महिलांचे जबरदस्तीने धर्मांतरण करण्यात आले आणि दहशतवादी संघटना ISIS मध्ये भरती करण्यात आले.

चित्रपटाचे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले आहे. तर विपुल अमृतलाल शाह या चित्रपटाचे निर्माते आहेत.

ब्रेन वॉशची कहाणी

चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर असे बोलले जात आहे की, हा चित्रपट द काश्मीर फाइल्स (2021) च्या धर्तीवर असून मोठा हिट ठरु शकतो.

काश्मीर फाइल्स हा काश्मिरी हिंदूंची तिथून पलायन आणि त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांची आणि त्यांच्या हत्यांची कहाणी होता.

अशा परिस्थितीत केरळमधील मुलींचे ब्रेनवॉश करुन त्यांना धर्मांतर करण्यास भाग पाडले गेले आणि नंतर त्यांना ISIS या दहशतवादी संघटनेत कसे सामील केले गेले हे 'द केरळ स्टोरी' चा ट्रेलर सांगत आहे.

दरम्यान, ट्रेलरची सुरुवात शालिनी उन्नीकृष्णन (अदा शर्मा) या केरळमधील हिंदू मुलीच्या परिचयाने होते. जी तिच्या आयुष्यात आनंदी आहे.

पण टर्निंग पॉइंट येतो तेव्हा शालिनीला ISIS ने कैद केले. हे असे पुरुष आहेत, जे इस्लामच्या नावाखाली आपल्या तरुणांना महिलांशी लैंगिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त करतात आणि नंतर त्यांना ISIS च्या हवाली करतात.

बंदीची मागणी

ट्रेलरमध्ये अदा शर्माचे धर्मांतर, लग्न आणि तस्करी करुन पाकिस्तानात घेऊन जाताना दाखवण्यात आले आहे.

याशिवाय, यात मुस्लिम महिलांवरील अत्याचारही दाखवण्यात आला आहे. चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासून 'द केरळ स्टोरी'वर बंदी घालण्याची मागणी होत आहे.

तमिळनाडूतील एका पत्रकाराने चित्रपटावर बंदी घालण्यासाठी केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ, केरळचे मुख्यमंत्री कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे विनंती केली आहे.

चित्रपटाच्या (Movie) माध्यमातून केरळची प्रतिमा मलीन करुन तिथे धार्मिक भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mopa Airport: पहिल्यांदा गोव्यातच! ‘मोपा’ विमानतळावर डिजिटल व्हिडिओवॉल; भारतातील पहिलेच डिझाईन

रॉड्रीक्स यांच्या प्रयत्नाने मुंबईत गोमंतकीयांची प्रचंड सभा भरली, 20 हजार गोवावासीय उपस्थित होते; ‘छोडो गोवा’ ठराव संमत झाला

Goa Politics: 'मतदारांचा भाजप-मगो युतीलाच पाठिंबा'! आमदार आरोलकरांचा विश्वास; धारगळमधून हरमलकर यांच्या विजयाची खात्री व्यक्त

Goa Liberation Day 2025: स्वातंत्र्यसैनिकांनी लढून मुक्त केलेला गोवा आपण कसा राखला पाहिजे, याची किमान जाणीव व्हावी....

Goa Liberation Day 2025: पोर्तुगीज येण्यापूर्वी लोक आदिलशहाच्या सैन्यात भरती होत असत, गोवा मुक्तीसाठी अविरत लढ्याची त्रिस्थळी

SCROLL FOR NEXT