The Kerala Story Dainik Gomantak
मनोरंजन

The Kerala Story Tax Free: मध्य प्रदेशानंतर आता या राज्यात 'द केरळ स्टोरी' होणार करमुक्त

लवकरच उत्तर प्रदेश राज्यात 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) हा चित्रपट करमुक्त करण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक

The Kerala Story Tax Free in UP: 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) हा चित्रपट 5 मे रोजी चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे पण काही लोक या चित्रपटाचा विरोध करत आहेत.

पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. पण काही राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी हा चित्रपट मध्य प्रदेशमध्ये करमुक्त करण्यात आला.

आता लवकरच उत्तर प्रदेश राज्यात हा चित्रपट करमुक्त करण्यात येणार आहे. याबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री  योगी आदित्यनाथ यांनी एक ट्वीट शेअर करुन घोषणा केली आहे.

योगी आदित्यनाथ यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, द केरळ स्टोरी हा चित्रपट उत्तर प्रदेश राज्यात करमुक्त करण्यात येणार आहे. 

मुख्यमंत्री सचिवालयाने सांगितले की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसह लोक भवन येथे होणाऱ्या विशेष स्क्रीनिंगमध्ये हा चित्रपट पाहू शकतात.

उत्तर प्रदेश राज्यात अक्षय कुमारचा  'सम्राट पृथ्वीराज' हा चित्रपट देखील करमुक्त करण्यात आला होता. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवराज सिंह चौहान  यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करुन 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट मध्य प्रदेश राज्यात करमुक्त करण्यात आल्याची घोषणा केली होती.

  • पश्चिम बंगालमध्ये 'द केरळ स्टोरी' वर बंदी

पश्चिम बंगाल सरकारने 'द केरळ स्टोरी' या चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. द्वेष आणि हिंसाचाराची कोणतीही घटना टाळण्यासाठी आणि राज्यात शांतता राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. 

दरम्यान, 'द केरळ स्टोरी' चित्रपटाला स्थगिती देण्यास नकार देणाऱ्या केरळ उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाला या प्रकरणावर लवकर सुनावणी घेण्याची विनंती केली, त्यानंतर सरन्यायाधीशांनी 15 मे रोजी सुनावणी घेण्यास सांगितले आहे.

5 मे रोजी केरळ हायकोर्टाने 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला होता. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कोणत्याही विशिष्ट समुदायाविरुद्ध काहीही आक्षेपार्ह नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

न्यायालयाने आदेश देण्यापूर्वी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला होता. हा निकाल देताना न्यायालयाने म्हटले की, या चित्रपटात इस्लाम आणि मुस्लिमांच्या विरोधात काहीही नाही.

  • 'द केरळ स्टोरी' चित्रपटाची स्टार कास्ट

अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बानी, सिद्धी इदनानी या कलाकरांनी 'द केरळ स्टोरी' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. सुदीप्तो सेन यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 'द केरळ स्टोरी' या सिनेमाची निर्मिती 30 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी या चित्रपटानं  7.5 कोटींची कमाई केली आहे.   

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT