The Kerala Story BO Collection Dainik Gomantak
मनोरंजन

The Kerala Story Day 5 Box-office Collection: 'द केरळ स्टोरी' नं बॉक्स ऑफिसवर पाचव्या दिवशी घेतली भरारी! कमावला इतक्या कोटींचा गल्ला...

या चित्रपटाचा वाद थांबण्याचे नावच घेत नाहीय. पण तरीसुद्धा या चित्रपटाच्या कमाईचे आकडेही दिवसेंदिवस वाढत आहे.

दैनिक गोमन्तक

The Kerala Story Day 5 Boxoffice Collection::  'द केरळ स्टोरी' हा चित्रपट रिलीज झाल्यावर जास्तच चर्चेत आहे. या चित्रपटाचा वाद थांबण्याचे नावच घेत नाहीय.

पण तरीसुद्धा या चित्रपटाच्या कमाईचे आकडेही दिवसेंदिवस वाढत आहे.

दरम्यान, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल सरकारने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणली आहे.

या चित्रपटावरुन वाद सुरु असुनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. अवघ्या पाच दिवसातच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 50 कोटींचा टप्पा पुर्ण केला आहे.

‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट 5 मे रोजी प्रदर्शित झाला होता. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जवळपास 8 कोटींची कमाई केली होती. पहिल्या वीकेंडमध्ये या चित्रपटाने एकूण 35 कोटींची कमाई केली.

सोमवारी देखील या चित्रपटाने 10 ते 11 कोटींची कमाई केली. यानंतर आता या चित्रपटाचे कलेक्शन 46 कोटींवर पोहोचले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने रिलीजच्या पाचव्या दिवशी 11 कोटी कमवत दमदार प्रवास सुरू ठेवला आहे. तसेच, या चित्रपटाने 5 दिवसांत 50 कोटींहून अधिक कमाई केली आहे. अवघ्या 5 दिवसांत या चित्रपटाने मेकिंग बजेट वसूल केले आहे.

'द केरळ स्टोरी' या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले असुन विपुल अमृतलाल शाह यांनी निर्मिती केली आहे. या चित्रपटामध्ये अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

या चित्रपटात अदा शर्मानं शालिनीची भुमिका अत्यंत दमदार पद्धतिने साकरलेली आहे. जी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.आता चित्रपटाच्या नजरा 100 कोटींच्या क्लबकडे लागल्या आहेत. या वीकेंडपर्यंत हा चित्रपट 100 कोटींहून अधिक कमाई करू शकेल, असे बोलले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT