The Kerla Story Dainik Gomantak
मनोरंजन

The Kerala Story : 'द केरला स्टोरी'ची कमाई बघुन थक्क व्हाल...

5 मे रोजी रिलीज झालेल्या 'द केरला स्टोरी' ची पहिल्या दिवसाची कमाई जाणुन घ्या..

Rahul sadolikar

वादाच्या भोवऱ्यात प्रदर्शित झालेल्या 'द केरळ स्टोरी'ला बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा चांगली ओपनिंग मिळाली आहे. सुदिप्तो सेन दिग्दर्शित या चित्रपटाची सुरुवात पूर्वी प्रदर्शित झालेल्या 'सर्कस', 'भेडिया' आणि 'शेहजादा' सारख्या चित्रपटांसारखीच आहे. 

केरळमधील तीन मुलींचे धर्मांतर आणि त्यांचे ब्रेनवॉशिंग आणि आयएसआयएसमध्ये भरतीची ही कहाणी प्रेक्षकांना भुरळ घालताना दिसत आहे. या चित्रपटाची आगाऊ बुकिंगही अक्षय कुमारच्या 'सेल्फी'प्रमाणेच झाली आहे. अशा परिस्थितीत पहिल्या दिवशी हा चित्रपट 'द काश्मीर फाइल्स'पेक्षा चांगली कमाई करताना दिसत आहे.

गेल्या वर्षी 'द काश्मीर फाइल्स' बाबत असाच वाद झाला होता. अनुपम खेर आणि दर्शन कुमार यांसारख्या स्टार्सने सजलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ३.२५ कोटी रुपयांची कमाई केली. मात्र, त्यानंतर या चित्रपटाबाबत देशात वेगळेच वातावरण पाहायला मिळाले. 

चित्रपटगृहांपासून राजकीय व्यासपीठांपर्यंत जोरदार घोषणाबाजी झाली आणि 'द काश्मीर फाइल्स'ची कमाई चांगली झाली होती.  चित्रपटांचे बिझनेस विश्लेषक तरण आदर्श यांच्या माहितीनुसार पहिल्याच दिवशी हा चित्रपट 8.3 कोटी रुपयांची देशांतर्गत कमाई करताना दिसत आहे.

द केरळ स्टोरी'वर शुक्रवारी केरळ उच्च न्यायालयाचा निर्णयही आला आहे. न्यायालयाने चित्रपटावर बंदी घालण्यास नकार दिला आहे. पण निर्मात्यांना YouTube आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून '32000 महिला धर्मांतरित' चा टीझर हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

वाद आणि विषय पाहता 'द केरळ स्टोरी'ची तुलना विवेक अग्निहोत्रीच्या 'द काश्मीर फाइल्स'शी केली जात आहे. पहिल्या दिवसाची स्थिती पाहता अदा शर्माचा 'द काश्मीर फाईल्स' हा चित्रपट पहिल्या दिवसापेक्षा चांगला व्यवसाय करेल असे वाटते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

Horoscope: रविवार ठरणार खास! वृषभ-कर्कसह 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा, घरात सुख-समृद्धी अन् नोकरीत प्रमोशनचे संकेत

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

SCROLL FOR NEXT