Vivek Agnihotri Dainik Gomantak
मनोरंजन

The Kashmir Files Controversy: 'द कश्मीर फाइल्स'च्या वादादरम्यान विवेक अग्निहोत्रींची मोठी घोषणा; बनवणार 'द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड'

The Kashmir Files Controversy: इफ्फीमधील ज्युरी नदव लॅपिड यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर 'द काश्मीर फाइल्स'नवा वाद सुरु झाला आहे.

दैनिक गोमन्तक

 'द कश्मीर फाइल्स'च्या (The Kashmir Files) वादादरम्यान दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट करत 'द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड' (The Kashmir Files Unreported) बनवणार असल्याची माहिती दिली आहे. 

53 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) नुकताच गोव्यात (Goa) पार पडला. दरम्यान नदाव लॅपिड (Nadav Lapid) यांनी 'द कश्मीर फाइल्स' वर वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणाले, "द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाचा 'इफ्फी' सारख्या महोत्सवात समावेश होणं ही धक्कादायक बाब आहे. तसेच हा चित्रपट प्रपोगंडा आणि वल्गर चित्रपट आहे"

'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा चित्रपटांचा नव्व्दच्या दशकात काश्मीर खोऱ्यातील पंडितांच्या हत्येच्या आणि अमानुष अत्याचारांच्या घटणांचे वर्णन करणारा आहे. विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. आता 'द कश्मीर फाइल्स'च्या वादादरम्यान विवेक अग्निहोत्री यांनी द कश्मीर फाइल्स'चा पुढचा भाग 'द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड' बनवणार असल्याची घोषणा केली आहे.

सध्या याबाबत फारशी माहिती समोर आलेली नाही. पण वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या विवेकच्या घोषणेवरून तो काहीतरी मोठे काम करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा स्थितीत आता याबाबत आणखी काही माहिती समोर येते का, हे पाहावे लागेल.

  • 'द काश्मीर फाइल्स' सुपरहिट ठरला होता
    'द काश्मीर फाइल्स' यावर्षी 11 मार्च रोजी रिलीज झाला होता. रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाला विरोधालाही सामोरे जावे लागले, त्यासोबतच या चित्रपटाला लोकांचा उदंड प्रतिसादही मिळाला. हा चित्रपट 250 कोटींहून अधिक कमाई करत सुपरहिट ठरला होता. त्याचबरोबर 'द काश्मीर फाइल्स - अनरिपोर्टेड' काय कथा घेऊन येते हेही पाहावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT