The Kashmir Files poster Twitter
मनोरंजन

तुमचं मन खंबीर असेल तर तुम्ही The Kashmir Files जरूर बघावा

दैनिक गोमन्तक
  • चित्रपट – The Kashmir Files

स्टारकास्ट – अनुपम खेर (Anupam Kher), पल्लवी जोशी (Pallavi Joshi), मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty), दर्शन कुमार (Darshan Kumar), चिन्मय मंडलेकर (Chinmaya Mandlekar), पुनीत इस्सर (Punit Issar), मृणाल कुलकर्णी (Mrunal Kulkarni)

  • दिग्दर्शक - विवेक अग्निहोत्री

रेटिंग - 3

2019 मध्ये, विवेक अग्निहोत्रीचा चित्रपट ' द ताश्कंद फाइल्स' (The Tashkent Files) प्रदर्शित झाला आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. या चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. 'द ताश्कंद फाइल्स'नंतर आता ' द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) विवेक अग्निहोत्री घेऊन आले आहेत. 90 च्या दशकात काश्मीरमधील काश्मिरी पंडित आणि हिंदूंच्या हत्याकांडाची आणि पलायनाची कहाणी यात सांगण्यात आली आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती सारखे दिग्गज कलाकार आहेतच पण त्याचबरोबर पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार सारखे अनुभवी कलाकार देखील या चित्रपटात दिसणार आहेत. 'द ताश्कंद फाइल्स'ला प्रेक्षक आणि समीक्षकांनी भरभरून दाद दिली होती, त्यामुळे आता 'द काश्मीर फाइल्स'मधून विवेक अग्निहोत्री पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकणार का, हे पाहावं लागेल. जर तुम्ही हा चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल, तर त्यापूर्वी तुम्ही हा रिव्ह्यु वाचू शकता.

काय आहे चित्रपटाची कथा?

चित्रपटाची कथा काश्मीरमधील शिक्षक पुष्कर नाथ पंडित (अनुपम खेर) यांच्या जीवनाभोवती फिरते. आजोबा पुष्करनाथ पंडित यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी कृष्णा (दर्शन कुमार) दिल्लीहून काश्मीरला येतो. कृष्णा त्याच्या आजोबांचा जिवलग मित्र ब्रह्मा दत्त (मिथुन चक्रवर्ती) सोबत राहतो. त्यादरम्यान पुष्करचे इतर मित्रही कृष्णाला भेटायला येतात. यानंतर चित्रपट फ्लॅशबॅकमध्ये जातो.

1990 पूर्वी काश्मीर कसे होते हे फ्लॅशबॅकमध्ये दाखवले आहे. यानंतर 90 च्या दशकात काश्मिरी पंडितांना धमकावले गेले आणि काश्मीर आणि त्यांचे घर सोडण्यास भाग पाडले गेले याची वेदनादायक कहाणी यात सांगण्याता आली आहे. कृष्णाला माहित नाही की त्या काळात त्याच्या कुटुंबाला कोणत्या कठीण प्रसंगातून जावे लागले असेल. यानंतर 90 च्या दशकातील घटनांचे पदर त्याच्यासमोर उलगडले जातात आणि त्या काळात काश्मिरी पंडितांना काय वेदना झाल्या हे दाखवले जाते.

रिव्ह्यु

2020 मध्ये 'शिकारा' नावाचा चित्रपट विधू विनोद चोप्रा यांनी दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट काश्मिरी पंडित आणि हिंदूंच्या हत्याकांडावर आणि पलायनावर आधारित होता. विधू विनोद चोप्राने एका प्रेमकथेच्या माध्यमातून काश्मिरी लोकांच्या दु:खाचे चित्रण करण्याचा प्रयत्न केला, पण विवेक अग्निहोत्रीने 'द काश्मीर फाइल्स'मधून वेगळी कथा दाखवण्याचा प्रयत्न केला. काश्मिरी हिंदूंची कहाणी त्यांनी या चित्रपटातून अतिशय सखोल आणि कठोरपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ही आपल्याला एका पूर्णपणे वेगळ्या जगात घेऊन जातो. चित्रपटात अशी अनेक दृश्ये आहेत ज्यामुळे तुमच्या अंगावर रोमांच उभे राहतील.चित्रपटाची कथा चांगली आहे आणि विवेक अग्निहोत्री त्याच्या कामात पूर्णपणे यशस्वी झाल्याचे दिसत आहे.

अभिनय आणि अभिनेते

कलाकारांच्या अभिनयाने हा चित्रपट एका नव्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. अनुपम खेर यांनी आपल्या अभिनयाने अनेकवेळा प्रेक्षकांची मने जिंकली असली तरी या चित्रपटात अनुपम खेर यांनी पुष्कर नाथ पंडित यांची व्यक्तिरेखा अशा प्रकारे साकारली आहे की प्रेक्षक थक्क होतील. चित्रपटसृष्टीतील ते सर्वात हुशार अष्टपैलू अभिनेता असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले. त्याचवेळी मिथुन चक्रवर्तीनेही आपल्या पात्राला पूर्ण न्याय दिला आहे. विद्यार्थी नेता म्हणून दर्शनकुमार यांनी अतिशय प्रभावीपणे कामगिरी बजावली.

त्याचवेळी, पल्लवी जोशीबद्दल सांगायचे तर, 'द ताश्कंद फाइल्स'साठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि 'द काश्मीर फाइल्स'साठीही आपण या पुरस्काराची प्रबळ दावेदार असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. फारुख अहमदच्या भूमिकेत पडद्यावर आपली छाप सोडणाऱ्या चिन्मयच्या अभिनयाचेही इथे कौतुक करावेसे वाटते. याशिवाय बाकीच्या कलाकारांनीही त्यांच्या पात्राला पूर्ण न्याय दिला आहे.

चित्रपटात काय कमतरता आहे?

चित्रपटात जी उणीव जाणवली ती म्हणजे त्याचा रनिंग टाईम. हा चित्रपट 2 तास 50 मिनिटांचा आहे. या चित्रपटात 30 मिनिटांचा कट सहज करता आला असता. चित्रपटातील काही दृश्ये जबरदस्तीने ओढण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसते. याशिवाय चित्रपटाचे संगीतही फारसे गाजले नाही. बॅकग्राउंड स्कोअर चांगला असता तर चित्रपटाला नवीन उंचीवर नेऊ शकले असते. हा चित्रपट कमकुवत मनाच्या लोकांसाठी नाही. जर तुमचं मन खंबीर असेल तर तुम्ही हा चित्रपट जरूर बघावा, कारण चित्रपटात अशी अनेक दृश्ये आहेत, जी पाहून तुम्ही डोळे बंद करू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT