Nadav Lapid  Dainik Gomantak
मनोरंजन

The Kashmir Files: वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी लॅपिड यांच्याविरोधात तक्रार दाखल

Nadav Lapid: हा चित्रपट नुकताच गोव्यातील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI 2022) मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.

दैनिक गोमन्तक

Complaint Against Nadav Lapid The Kashmir Files Controversy: 'द काश्मीर फाइल्स' चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या जीवनावर आणि संघर्षावर आधारित आहे. हा चित्रपट नुकताच गोव्यातील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI 2022) मध्ये प्रदर्शित करण्यात आला.

दरम्यान, चित्रपट पाहिल्यानंतर, IFFI 2022 आंतरराष्ट्रीय ज्युरी प्रमुख, Nadav Lapid यांनी या चित्रपटाचे वर्णन 'अश्लील' आणि 'प्रोपगेंडा' असे केले. नदव यांच्या या वक्तव्याने देशभरात खळबळ उडाली. जिथे राजकीय पक्ष आणि चित्रपटाच्या निर्मात्यांनी यावर आपले मत व्यक्त केले, तिथे आता नदव लॅपिड यांच्या विरोधात आणखी एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.

नदव लॅपिड यांच्या विरोधात तक्रार दाखल

'द काश्मीर फाइल्स' वरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी लॅपिड यांच्याविरोधात आता तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिल्लीस्थित (Delhi) वकील विनीत जिंदाल यांनी लॅपिड यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे, या तक्रारीची कॉफी त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केली आहे.

तक्रारीची कॉफी Twitter वर शेअर केली

विनीत जिंदाल यांनी गोवा पोलिसांकडे (Goa Police) ही तक्रार दाखल केली आहे. गोव्याचे डीजीपी जसपाल सिंग यांना लिहिले की - 'नदव यांनी केलेले वक्तव्य पूर्णपणे चुकीचे आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT