The Kashmir Files poster Twitter
मनोरंजन

'द काश्मीर फाइल्स'ची ग्रेट ओपनिंग, पहिल्याच दिवसाचे कलेक्शन 3.55कोटींच्या पार

1990 मध्ये घडलेल्या काश्मिरी पंडितांची वेदनादायक कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

अनुपम खेर स्टारर 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाने 11 मार्च रोजी बॉक्सऑफीसवर धमाकेदार सुरुवात केली आहे. काश्मिरी पंडितांवर बनलेल्या हृदयद्रावक चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर अनेकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटाने जबरदस्त ओपनिंग केली आहे. काश्मीर फाइल्सला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी द काश्मीर फाइल्सच्या पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन शेअर केले आहे.'#TheKashmirFiles ने पहिल्या दिवशी एक मोठं सरप्राईज दिलं...मर्यादित स्क्रीन असूनही दिवसाअखेरीस चित्रपटाची जादू सिनेरसिकांवर होतांना दिसत आहे. दुसऱ्या आणि तिसर्‍या दिवशी संध्याकाळ आणि रात्रीचे शो एक्स्ट्रा-ऑर्ड‍िनरी होते.. या कमाईत प्रचंड वाढ होईल हे नक्की. आज शुक्रवारी 3.55कोटींची कमाई या चित्रपटाने केली आहे #India' अशी पोस्ट तरण आदर्श यांनी केली आहे.

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित, काश्मीर फाइल्स 1990 मध्ये काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडावर आधारित आहे. भारताच्या इतिहासातील ही एक अत्यंत क्लेशदायक घटना आहे, जी काश्मिरी आणि इतर भारतीयांच्या मनात अनेक दशकांपर्यंत राहील. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसणारी दहशत, घबराट, भीतीने प्रेक्षकांना खूप उत्साही केले होते.परिणामी चित्रपट पाहण्यासाठी लोकांची ओढ वाढत आहे.

561 चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित

काश्मीर फाइल्स भारतात 561 सिनेमागृहात, परदेशातील 113 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. ही संख्या इतर बिग बजेट चित्रपटांपेक्षा कमी आहे. मात्र असे असतानाही चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई आश्चर्यकारक आहे. या सिनेमात अनुपम खेर व्यतिरिक्त मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, प्रकाश बेलावाडी, दर्शन कुमार, भाषा सुंबली, पुनीत इस्सार यांच्यासह इतर कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

SCROLL FOR NEXT