जेव्हा लोकांनी पहिल्यांदा ऐकला श्रेया घोषालचा मधुर आवाज

संजय लीला भन्साळी यांच्या आईने घेतली श्रेया घोषालची दखल
Shreya Ghoshal
Shreya GhoshalDainik Gomantak

श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) हे चित्रपटसृष्टीतील एक मोठ नाव आहे. श्रेयाने तिच्या करिअरची सुरुवात अगदी लहान वयात केली. वयाच्या 4 थ्या वर्षापासून संगीताचे धडे घेत असलेल्या लहानग्या श्रेयाने वयाच्या 6व्या वर्षी शास्त्रीय संगीत शिकण्यास सुरुवात केली. यानंतर वयाच्या 16 व्या वर्षी तीचे नाव प्रसिद्धीस आले. तीच्या यशस्वी कारकिर्दीचे श्रेय चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांना जाते . श्रेयाने तिच्या करिअरमध्ये खूप मेहनत घेतली आणि त्यानंतर ती पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर एका टीव्ही रिअॅलिटी शो स्पर्धेतून प्रेक्षकांसमोर आली.

जेव्हा लोकांनी पहिल्यांदा श्रेया घोषालचा मधुर आवाज ऐकला

या शोमध्ये जेव्हा प्रेक्षकांनी श्रेयाचा आवाज ऐकला तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले, इतका गोड आवाज असलेल्या श्रेयाला सोनू निगमपासून लता मंगेशकरपर्यंत या सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद मिळाले. झी टिव्ही वरील सारेगमप मध्ये श्रेयाने पहिल्यांदा गाणं गायलं होतं.

संजय लीला भन्साळी यांच्या आईमुळे संधी मिळाली

यादरम्यान संजय लीला भन्साळी यांच्या आईने श्रेया घोषालची दखल घेतली आणि आपल्या मुलाला या गायिकेबद्दल सांगितले. त्यावेळी संजय लीला भन्साळींनी श्रेयाला ऐकलं तेव्हाच त्यांनी ठरवलं होतं की ही मुलगी त्यांच्या चित्रपटात गाणं गाणार. संजय लीला भन्साळी तेव्हा 'देवदास' चित्रपट बनवण्याच्या तयारीत होते. त्यावेळी जेव्हा संजय लीला भन्साळी श्रेयाला बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक देण्यासाठी श्रेयाकडे आले, तेव्हा सुरुवातीला श्रेयाचा यावर विश्वासच बसला नाही. पण जेव्हा श्रेयाने तिचा मधुर आवाज संजयच्या संगीताला आवाज दिला तेव्हा जगोतील संगीतप्रेमी तीचं गाण ऐकत आणि गुणगुणत राहिले.

Shreya Ghoshal
50 व्या वर्षी इलॉन मस्क बनले 7 व्या मुलाचे वडील

संजय लीला भन्साळी हे श्रेया घोषालवर झाले इंप्रेस

संजय श्रेया घोषालवर इतके प्रभावित झाले की त्यांने एका नवोदित श्रेयाला संपूर्ण देवदास अल्बम गाण्याची संधी दिली. हा चित्रपट तर सुपरहिट झालाच, शिवाय या चित्रपटातील गाणीही चांगलीच पसंतीस उतरली होती. आजही ही गाणी रसिकांना खूप आवडतात. हे पाहून हा चित्रपट बॉलिवूडचा आयकॉन चित्रपट ठरला. त्यानंतर श्रेया आपल्या संगीत कारकिर्दित पुढे जात, मोठी होत गेली. आणि लवकरच ती इंडस्ट्रीतील सर्वात महागडी आणि प्रसिद्द गायिका बनली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com