The Ghost Dainik Gomantak
मनोरंजन

The Ghost: टीझरमध्ये नागार्जुनचा किलींग टशन; फर्स्ट लूक आउट

साऊथचा सुपरस्टार नागार्जुन त्याच्या आगामी 'द घोस्ट' चित्रपटामुळे सध्या चर्चेत आला आहे. आता 'द घोस्ट'मधील नागार्जुनचा फर्स्ट लूक देखील समोर आला आहे.

दैनिक गोमन्तक

साऊथचा सुपरस्टार नागार्जुन त्याच्या आगामी 'द घोस्ट' चित्रपटामुळे सध्या चर्चेत आला आहे. आता 'द घोस्ट'मधील (The Ghost) नागार्जुनचा फर्स्ट लूक देखील समोर आला आहे. यासोबतच निर्मात्यांनी चित्रपटाचा एक छोटा टीझर व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला आहे. नागार्जुनच्या 'द घोस्ट' चित्रपटाचा टीझर हा व्हिडिओ सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेला आहे. या टीझर व्हिडिओमध्ये नागार्जुन सूट बूट लूकमध्ये दिसून येत आहे, परंतु नागार्जूनचा हा अवतार पाहून कोणीही अचंबीत होऊ शकते. (The teaser of Nagarjuna The Ghost movie has arrived)

सुमारे एक मिनिटाचा 'द घोस्ट'चा हा टीझर व्हिडिओला नागार्जुनच्या बॅकलूकपासून सुरू होतो. ज्यामध्ये नागार्जुन दोन्ही हातात तलवार घेऊन दिसत आहे. व्हिडिओमध्ये नागार्जुन आपल्या समोर उभ्या असलेल्या लोकांना तलवारीच्या धारेने गारद करत आहे. व्हिडिओच्या शेवटच्या भागात नागार्जुनसमोरचा चंद्र रक्तासारखा लाल रंगात दिसून येत आहे. यानंतर व्हिडिओमध्ये समोरून नागार्जुनचा अँग्री यंग मॅन लूक चाहत्यांना दिसून येत आहे.

या चित्रपटाबद्दल निर्मात्यांनी 'तुम्ही त्याला मारू शकत नाही' तुम्ही त्याच्यापासून पळून जाऊ शकत नाही, तुम्ही फक्त दयेची याचना करू शकता असे लिहीले होते. आता चित्रपटातील नागार्जुनचा हा लूक पाहिल्यानंतर त्याचा अवतार चाहत्यांच्या कल्पनेपलीकडचा असल्याचे मात्र स्पष्ट झाले आहे. नागार्जुनचा चित्रपट 'द घोस्ट' 5 ऑक्टोबर 2022 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा टीझर व्हिडिओ पाहिल्यानंतर 'द घोस्ट'च्या प्रदर्शनाची चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

SCROLL FOR NEXT