Dilip Joshi TMKOC  Dainik Gomantak
मनोरंजन

Dilip Joshi TMKOC : जेठालाल आता 'तारक मेहता का'...मध्ये दिसणार नाहीत? अभिनेते दिलीप जोशींनी घेतला मोठा ब्रेक

Rahul sadolikar

Dilip Joshi leaves Tarak Mehata Ka ooltah Chashma : चार्ली चॅप्लीनसारखी मिशी, अतरंगी संवाद आणि आपल्या स्थुल शरीराने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे जेठालाल अर्थात दिलीप जोशी आता तारक मेहता का उल्टा चष्मा मध्ये दिसणार नाहीत.

तारक मेहता का उल्टा चष्मा च्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का असुन अभिनेते दिलीप जोशी यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे .

14 वर्षांपासून शो सुरू

'तारक मेहता का उल्टा चष्मा' गेल्या 14 वर्षांपासून चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. एवढ्या व्यस्त वेळापत्रकात कलाकारांना फारसा ब्रेक मिळत नाही आणि यावेळी जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांनी त्यांच्या शेड्युलमधून थोडा ब्रेक घेतला आहे. खरं तर, तो शो सोडणार की नाही, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे

हे आहे कारण

दिलीप जोशी यांच्या शो सोडण्याच्या निर्णयाचे वृत्त खरे की खोटे? कारण काय? असे अनेक प्रश्न आता शोच्या चाहत्यांना पडले आहेत.

जेठालाल यांच्या मोठ्या ब्रेकचं खरं कारण आता समोर आलं आहे. . 'ETimes' च्या वृत्तानुसार, 'दिलीप जोशी यांनी त्यांच्या शोमधून ब्रेक घेतला आहे आणि सध्या ते कुटुंबासह टांझानियाच्या छोट्या धार्मिक सहलीवर आहेत.'

दिलीप जोशी सध्या दरेसलाममध्ये

स्वामीनारायण मंदिरात आयोजित एका खास कार्यक्रमासाठी अभिनेता दरेसलामध्ये आहे. चाहत्यांना माहित आहे की दिलीप जोशी सोशल मीडियावर फारसे सक्रिय नसतात, म्हणून त्यांनी अद्याप त्यांच्या सहलीचे कोणतेही फोटो पोस्ट केलेले नाहीत. पण दिलीप जोशींची शेवटची पोस्ट अजूनही त्याच्या धार्मिक प्रवासाबद्दल बरेच काही सांगते.

तारक मेहताचा ट्रॅक

व्हिडीओमध्ये दिलीप जोशींनी सांगितलं आहे की, धार्मिक प्रसंगी तो अबुधाबीलाही जाणार आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या ट्रॅकबद्दल बोलताना, गोकुळधामच्या लोकांनी अखेर गणेश चतुर्थी सेलिब्रेशनला सुरुवात केली आणि बाप्पाचे स्वागत केले. यावेळी जेठालालने आपण गणेशोत्सवात सहभागी होऊ शकणार नसल्याचे स्पष्ट केले.

 बाप्पाचे स्वागत करून पहिली आरती करून आमंत्रण असल्याने ते इंदूरला रवाना होतील. जेठालाल शूटिंगमधून ब्रेक घेत असल्याने काही दिवसांसाठी शोमधून बाहेर जात असल्याचे दृश्य आहे.

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

SCROLL FOR NEXT