KBC 15 : "इथे यायला पैसे लागत नाही हे सिद्ध करायचं होतं" KBC च्या अफवा स्पर्धकाने बिग बींना सांगितल्या...

टिव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध शो कौन बनेगा करोडपतीच्या नावे लोकांना फोन करुन आर्थिक फसवणूकीचे प्रकार सुरू झाले आहेत.
Amitabh Bachchan in KBC
Amitabh Bachchan in KBCDainik Gomantak
Published on
Updated on

Kaun Banega Crorepati Rumours : बॉलीवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन होस्ट करत असलेला कौन बनेगा करोडपतीचा 15 वा सीझन सध्या सुरू आहे.

करोडो रुपयांपर्यंतचा टप्पा गाठणारे काही स्पर्धक या सिझनमध्ये दिसलेच शिवाय कठीण परिस्थितीशी तोंड देत आपलं ध्येय गाठू इच्छिणारे काही ध्येयवादी लोकही या खेळात आपलं नशीब आजमावत होते.

बिहारचा स्पर्धक हॉटसीटवर

नुकत्याच प्रसारित झालेल्या एका एपिसोडमध्ये बिहारचे मंडल कुमार नावाचे एक स्पर्धक हॉटसीटवर होते.

मंडल यांनी सांगितले की त्यांना आपल्या पत्नीला शोमध्ये जोडीदार म्हणून आणायचे होते परंतु घरी 16 महिन्यांचे मूल आहे आणि त्यामुळे त्यांची पत्नी त्यांच्यासोबत येऊ शकली नाही. 

लोकांना चुकीचे सिद्ध करायचे होते

खेळ पुढे जात असतानाच अमिताभ बच्चन यांनी मंडल कुमार यांच्याशी संवाद साधत स्पर्धक मंडल यांनी केबीसीमध्ये येण्याचे कारण सांगितले. 

मंडल कुमार म्हणाले ते बिहारमधील चंडी या छोट्याशा गावातले आहेत. या गावात अनेक लोकांना असा गैरसमज आहे की स्पर्धकांना केबीसीमध्ये येण्यासाठी पैसे द्यावे लागतात आणि त्याला लोकांना चुकीचे सिद्ध करायचे होते की शोमध्ये येण्यासाठी फक्त ज्ञान आवश्यक आहे.

Amitabh Bachchan in KBC
KBC 15 मध्ये दिसला झाकीर खान... भावुक शायरीने 'बिग बींच्या डोळ्यात पाणी

अमिताभ बच्चन यांनी केलं सावध

मंडल कुमार यांनी सांगितलेल्या लोकांना असलेले आणि अफवांबद्दल बोलताना अमिताभ बच्चन यांनी स्पर्धकांना गेम शोमध्ये सहभागी होण्यासाठी पैसे देऊ नका असा इशारा दिला. 

बिग बी पुढे म्हणाले 'हो, बर्‍याच अफवा पसरल्या आहेत आणि अनेकांना खोटे कॉल्स देखील येतात की शोमध्ये सामील होण्यासाठी तुमची निवड झाली आहे, परंतु जे प्रेक्षक शो पाहत आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की असे काहीही होऊ शकत नाही.  

त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल आणि केवळ तुमचे ज्ञान तुम्हाला शोमध्ये आणू शकते.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com