Adhar Jain viral Photos Dainik Gomantak
मनोरंजन

तारा सुथारियासोबत ब्रेकअप होताच आधार जैनने नवा पार्टनर शोधलाही...

अभिनेत्री तारा सुथारिया आणि करीना कपूरचा भाऊ आधार जैन यांचा ब्रेकअपच्या बातम्या गेल्या काही दिवसांपूर्वी समोर आल्या होत्या.

Rahul sadolikar

Adhar Jain viral Photos : बॉलीवूडच्या प्रेमाचा काही भरवसा नसतो. आज एकाशी ब्रेक अप तर लगेच उद्या नव्याने प्रेम. काही लोकांना ब्रेक अप पचवायला वर्षे जातात . मात्र आधार जैन या बाबतीत खूप भाग्यवान असल्याचे दिसते. म्हणूनच तारा सुतारियासोबत ब्रेकअप झाल्यानंतर लगेचच त्याच्या आयुष्यात प्रेमाने पुन्हा दार ठोठावले. 

हे आम्ही म्हणत नसून, काल रात्री करीना कपूरच्या दिवाळी पार्टीत जे फोटो समोर आले आहेत, ते हेच सांगत आहेत. आधार जैनही त्याची बहीण आणि भावाच्या या पार्टीत पोहोचला पण आपल्या नव्या गर्लफ्रेंडसोबत.

करीनाच्या पार्टीत आधार जैन गर्लफ्रेंडसोबत

शनिवारी रात्री, करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते ज्यामध्ये फक्त कुटुंब आणि खास मित्रांना आमंत्रित केले होते. 

त्यामुळे करिनाचा भाऊ आधार जैनही पोहोचला पण एकटा नाही तर कुणासोबत आणि त्यांना पाहून हे स्पष्ट झाले की ते रिलेशनशिपमध्ये आहेत आणि खूप आनंदी आहेत. 

दोघेही एकमेकांचे हात धरलेले दिसले आणि दोघांच्या चेहऱ्यावरची लाली ते प्रेमात असल्याचे दाखवण्यासाठी पुरेसे होते. 

यूजर्सच्या कमेंट्स

तथापि, आधारने, ती सौंदर्यवती कोण होती हे उघड केले नाही. यावर युजर्स कमेंटही करत आहेत. एकाने लिहिले- ते किती लवकर पुढे जातात. त्यामुळे या पोस्टवर आश्चर्यकारक प्रतिक्रियांचा पूर आला होता. 

तारा सुतारियानेच दिली ब्रेकअपची न्यूज

या आठवड्यात तारा सुतारियाने एका मुलाखतीत तिच्या ब्रेकअप झाल्याचं मान्य केलं. बऱ्याच दिवसांपासून ही बातमी येत होती पण ताराने अखेर याची पुष्टी केली आणि ती आता रिलेशनशिपमध्ये नसल्याचे सांगितले. 

मात्र, ब्रेकअपचे कारण अद्याप समोर आलेले नाही. काही काळापूर्वी तारा कार्तिक आर्यनला डेट करत असल्याच्या बातम्याही आल्या होत्या पण तिने हे खोटे असल्याचे म्हटले होते. 

Horoscope: कृष्ण जन्माष्टमीला गजकेसरी योग! 'या' 3 राशींना नशिबाची साथ; मिळेल आर्थिक लाभ

Goa Live Updates: नागेशीत 'गोविंदा रे गोपाळा'च्या गजरात दही हंडी साजरी

Irfan Pathan and Shahid Afridi Fight: 'आफ्रिदीने कुत्र्याचं मांस खाल्लं...', फ्लाइटमध्ये झालेल्या वादाबद्दल इरफान पठाणने केला मोठा खुलासा

बेकायदेशीर! PFI सोबत लिंक असल्याच्या संशयावरुन गोव्यातील उद्योगपतीच्या अटकेबाबत हायकोर्ट काय म्हणाले?

Cricketer Dies: क्रिडाविश्वात खळबळ, पहिला वर्ल्ड कप जिंकून देणार्‍या क्रिकेटपटूचं निधन

SCROLL FOR NEXT