Suriya Fan Dies Dainik Gomantak
मनोरंजन

Suriya Fan Dies : सुपरस्टार सुर्याच्या वाढदिवसाचे बॅनर लावताना चाहत्याचा विजेचा धक्क्याने मृत्यू

साऊथचा सुपरस्टार सुर्याचा वाढदिवस 23 जुलै रोजी त्याच्या फॅन्सकडुन साजरा केला जात असताना एक दुर्देवी घटना घडली.

Rahul sadolikar

अभिनेता सुर्याचा वाढदिवस त्याच्या फॅन्सकडून 23 जूलै रोजी साजरा करण्यात आला मात्र यादरम्यान एक वाईट घटना घडली आहे. आंध्र प्रदेशात सुर्याच्या वाढदिवसाचे तारेचे बॅनर लावताना त्याच्या दोन चाहत्यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना पालनाडू येथे घडली, जिथे दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सूर्याचा बॅनर लावण्यासाठी पुढाकार घेतला. पीडितांच्या कुटुंबीयांनी या घटनेसाठी कॉलेजला जबाबदार धरले आहे

फ्लेक्सच्या लोखंडी रॉडमुळे बसला धक्का

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील पालनाडू जिल्ह्यातील मोपुलावरीपालम गावात विजेचा धक्का लागून नरसरावपेट मंडळाचे नक्का व्यंकटेश आणि पोलुरी साई यांचा मृत्यू झाला. फ्लेक्सीचा लोखंडी रॉड ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायरच्या संपर्कात आल्याने ही घटना घडली आणि दोन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. मृतदेह नरसरावपेठ शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. हे दोघेही नरसरावपेठ येथील खासगी पदवी महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकत होते.

माझ्या भावाच्या मृत्यूला कॉलेज जबाबदार

पोलुरी साईची बहीण अनन्या हिने तिच्या भावाच्या मृत्यूसाठी कॉलेजला जबाबदार धरले. तिने एएनआयला सांगितले, "माझ्या भावाच्या मृत्यूला कॉलेज जबाबदार आहे. आम्ही कॉलेजला भरपूर फी भरत आहोत.

कॉलेजमध्ये येण्यापूर्वी त्यांनी आम्हाला आश्वासन दिले होते की विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि देखरेख केली जाईल, परंतु, कॉलेज वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे संरक्षण आणि देखरेख करत नाही. आम्ही रोजंदारी कामगार आहोत. कॉलेजची फी भरण्यासाठी आम्ही खूप धडपडतो, माझ्या भावाच्या चांगल्या आयुष्यासाठी धडपडत असताना ही घटना घडली."

सुर्याचा आगामी कंगुवा

सुर्याच्या आगामी चित्रपट कंगुवाची पहिली झलक, ज्याला “पराक्रमी शूर गाथा” म्हटले जाते, त्याच्या वाढदिवशी शेअर केले गेले. याचे दिग्दर्शन चित्रपट निर्माता शिवा करत असून संगीत देवी श्री प्रसाद यांनी दिले आहे. या चित्रपटात दिशा पटानी देखील आहे. त्याला यूव्ही क्रिएशन्स आणि स्टुडिओ ग्रीनचा पाठिंबा आहे.

चित्रपटाची पहिली झलक

पहिली झलक शेअर करताना, स्टुडिओ ग्रीनने ट्विटरवर पोस्ट केले, “निर्भय माणूस. वन्य जीवन. शक्तिशाली कथा. या सर्वांचे साक्षीदार होण्यासाठी सज्ज व्हा... राजा येथे आहे.” पहिली झलक तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, हिंदी आणि इंग्रजीमध्ये रिलीज झाली आणि लवकरच आणखी चार भाषांमध्ये प्रदर्शित होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT