Comedian Bonda Mani Dainik Gomantak
मनोरंजन

Bonda Mani : प्रख्यात तमिळ कॉमेडियन बोंडा मणींनी घेतला वयाच्या ६०व्या वर्षी अखेरचा श्वास

Bonda Mani : त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत. बोंडा मणींच्या निधनाचे वृत्त कळताच अनेक चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हळहळ व्यक्त केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Bonda Mani : तमिळ चित्रपटातील अतिशय गाजलेल व्यक्तिमत्व तसेच आपल्या प्रेक्षकांना सतत कॉमेडिच्या माध्यमातून हसत खेळत ठेवणारे. तमिळ अभिनेते, कॉमेडियन बोंडा मणींनी वयाच्या ६० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

शनिवारी रात्रीच्या सुमारास ते अचानक खाली कोसळले, त्यानंतर बोंडांना चेन्नईमधील शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणी पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची अधिकृत माहिती श्रीधर पिल्लई यांनी ट्विटर (x) या सोशल मीडिया माध्यमाद्वारे रविवारी दिली.

बोंडा यांच्या अनेक भूमिकांनी तमिळ प्रेक्षकांना भूरळ घातली. ते गेल्या अनेकदिवसांपासून आजाराने ग्रासलेले होते. काही वर्षापूर्वी तमिळ चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी बोंडाना उपचार करण्यासाठी आर्थिक मदत देखील केली होती.

श्रीलंकन वंशाचे होते बोंडा मणी

बोंडा मनी हे श्रीलंकन वंशाचे असले तरी त्यांचे भारताशी अतूट नाते होते.भारतीय संस्कृतीशी असणारा जिव्हाळा त्यांच्या कलाकृतीतून दिसून येतो. त्यांनी आतापर्यंत 270 पेक्षा अधिक चित्रपटामध्ये काम केले आहे.

तसेच त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत. बोंडा मणींच्या निधनाचे वृत्त कळताच अनेक चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हळहळ व्यक्त केली आहे.

मणींचे पार्थिव पोझिचलूर येथील त्यांच्या निवासस्थानी श्रद्धांजलीसाठी ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर ५ वाजता चेन्नईतील क्रोमपेट स्मशाभूमित अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Childhood Depression: स्मार्टफोन आणि नैराश्य

Goa Monsoon: गोव्यात मान्सूनचे आगमन; हवामान विभागाडून चार दिवसांचा 'यलो अलर्ट'!

मालपे येथील संरक्षक भिंत पुन्हा धोक्यात; पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्ती करण्याची स्थानिकांची मागणी

Goa Power Cuts: हसापूर, हणखणेतील वीज समस्या सोडवा; काँग्रेस कार्यकर्त्यांची वीज कार्यालयावर धडक, साहाय्यक अभियंत्यांशी चर्चा

Hasapur Bridge: हसापूर पूल महिन्याभरात वाहतुकीस खुला; काँक्रीटचे काम पूर्ण

SCROLL FOR NEXT