Tabu Birthday Special Dainik Gomantak
मनोरंजन

Tabu: वयाच्या ५२ व्या वर्षीही तब्बू 'सिंगल' का?

Tabu: त्यानंतर ती साजिद नाडियाडवाला यांच्याबरोबर रिलेशनमध्ये होती.

दैनिक गोमन्तक

Tabu: बॉलीवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्या वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. त्यापैकी एक अभिनेत्री म्हणजे तब्बू होय. तब्बूने अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे विविध चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आज तब्बूचा ५२ वा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात काही खास गोष्टी.

तब्बूच्या करिअरची सुरुवात आणि गाजलेले चित्रपट

4 नोव्हेंबर १९७१ ला तब्बूचा जन्म हैदराबाद मध्ये झाला. तब्बूने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. १९८५ ला 'हम नौजवान' या चित्रपटात तिने भूमिका निभावली होती. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही.

आजपर्यंत बॉलीवूडमध्ये एकापेक्षा एक चित्रपटात काम करुन मनोरंजन सृष्टीत तब्बूने महत्वाचे योगदान दिले आहे. माचीस, कालापानी, हैदर, चिनी कम, अस्तित्व, मकबूल, चांदणी बार आणि दृश्यम असे तिचे अनेक गाजलेले चित्रपट आहेत. हिंदीशिवाय तिने इंग्रजी, मराठी, मल्याळम, बंगाली, तेलगू, तमिळ अशा विविध भाषांमध्ये काम केले आहे.

तब्बूचे वैयक्तिक आयुष्य

तब्बू फक्त तिच्या दर्जेदार चित्रपटांमुळे नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील मोठ्या चर्चेत राहिली आहे. चित्रपटात भूमिका स्विकारताना तिने ज्याप्रकारे परंपरेने आलेल्या भूमिकांशिवाय तिला जे आवडेल ती भूमिका साकारली तसेच तिने खाजगी आयुष्यातदेखील परंपरांचा किंवा इतरांप्रमाणे जगण्याचा प्रयत्न केला नाही. आजही वयाच्या ५२ व्या वर्षी ती एकटी आनंदी आयुष्य जगत आहे.

मात्र इतक्या वर्षांच्या काळात तिचे अनेकांबरोबर नाव जोडले गेले आहे. संजय कपूर तिचे पहिले प्रेम होते. मात्र हे नाते फार कमी काळ टिकले. त्यानंतर ती साजिद नाडियाडवाला यांच्याबरोबर रिलेशनमध्ये होती मात्र साजीद दिव्या भारती यांना विसरु न शकल्याने ते तब्बूबरोबरच्या नात्यावर लक्ष देऊ शकले नाहीत. त्यानंतर तब्बूचे नाते साऊथ सुपरस्टार अक्किनेनी नागार्जुना यांच्याबरोबर जोडले गेले.

मात्र तब्बूच्या जिथे नात्याविषयी कमिटमेंट मिळाली नाही तिथे तब्बूने एकटी राहणे पसंत केले आणि आज ती आपल्या आयुष्यात आनंदी आहे. दरम्यान, बॉलीवूडमध्ये ती अजय देवगण आणि फराह खान यांच्या जवळची आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण बॉलीवूडने तब्बूला शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Gopal Khemka Murder: बिहार हादरले, गोळ्या घालून प्रसिद्ध उद्योगपती गोपाल खेमका यांची हत्या

SCROLL FOR NEXT