Tabu is still single because ajay devgan Dainik Gomantak
मनोरंजन

Birthday Special: अजय देवगनमुळे मी सिंगल

दिसायला इतकी सुंदर असूनही तब्बू अजूनही अविवाहित आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडची (Bollywood) लोकप्रिय अभिनेत्री तब्बू (Tabu) आज तिचा 51 वा वाढदिवस साजरा करत आहे. तीचा जन्म 4 नोव्हेंबर 1970 रोजी हैदराबादमधील मुस्लिम कुटुंबात झाला होता. 90 च्या दशकापासून या अभिनेत्री तिच्या उत्कृष्ट अभिनयाने रसिकांचे खूप मनोरंजन केले. 90च्या दशकात तब्बूची सिने अदाकारी पडद्यावर जोरदार गाजली. दिसायला इतकी सुंदर असूनही तब्बू अजूनही अविवाहित आहे.

तब्बूने लहानपणापासूनच चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. अभिनेत्रीला पहिली संधी देव आनंदने 'हम नौजवान'मधून दिली होती. त्यावेळी तब्बू अवघ्या 14 वर्षांची होती आणि तिने बलात्कार पीडितेची भूमिका साकारली होती. तेव्हा तीचा अभिनय खूप प्रेक्षकांना खूप आवडला होता.

तब्बूने 1991 च्या कुली नं. 1 या तेलगू चित्रपटातून अपोजिट अभिनेत्री म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली. या अभिनेत्रीचा पहिला बॉलिवूड डेब्यू चित्रपट काही विशेष ठरू शकला नाही. यानंतर अभिनेत्रीने अजय देवगणसोबत 'विजयपथ'मध्ये काम केले. आणि हा चित्रपट खूप गाजला. आपल्या कारकिर्दीत तब्बूने बीवी नंबर 1, हुतुतू, हेरा फेरी, मकबूल, चीनी कम, हैदर, दे दे प्यार दे, भूल भुलैया 2 यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

अजूनही सिंगल असल्याचे कारण अजय देवगण

तब्बू दिसायला सुंदर आणि करिअरमध्ये सक्सेस असूनही ती सिंगल आहे. अभिनेत्रीने तिच्या मुलाखतीत सांगितले की, अजय देवगणमुळेच मी आजपर्यंत सिंगल आहे. तब्बू म्हणाली होती, माझे चुलत भाऊ समीर आणि आर्य अजय देवगणचे शेजारी होते. दोघेही माझ्यावर लक्ष ठेवून माझा पाठलाग करायचे. कोणीही मुलगा माझ्या जवळ आला तर दोघेही त्याला मारहाण करायचे. अजय माझा खूप चांगला मित्र आहे आणि आम्ही दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. तो माझा एक खूप चांगला प्रोटेक्टिव मित्र आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: 'नोबेल मिळाला नाही, आता मी शांततेचा विचार करणार नाही'; ट्रम्प यांचं नॉर्वेला खळबळजनक पत्र, ग्रीनलँडवर ठोकला दावा!

Bicholim Mining Protest: पैरातील लोकांचा खाणीविरोधात पुन्हा एल्गार! साळगावकर खाणीचे कामकाज पाडले बंद; प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामस्थ आक्रमक

Pakistani Actress Video: "भारतीय पुरुष पाकिस्तानी मुलींसाठी वेडे...", पाक अभिनेत्रीच्या दाव्याने सोशल मीडियावर वाद, व्हिडिओ VIRAL

Viral Post: "आता तरी गंभीर व्हा!" विजयाचा पत्ता नाही अन् पराभवांचे रेकॉर्ड्स; नेटकऱ्यांनी गौतम गंभीरला धरलं धारेवर

Goa Crime: मांद्रेत धक्कादायक प्रकार, 6 जणांच्या टोळक्याकडून वृद्ध पती-पत्नीसह मुलाला मारहाण; प्रॉपर्टीच्या वादातून राडा!

SCROLL FOR NEXT