taarak mehta ka ooltah chashmah  Dainik Gomantak
मनोरंजन

तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये नवीन 'नट्टू काका'ची एन्ट्री

taarak mehta ka ooltah chashmah 'new nattu kaka: तारक मेहता का 'उल्टा चष्मा' च्या चाहत्यांसाठी मोठी बातमी नट्टू काकांची व्यक्तिरेखा पुन्हा पडद्यावर येणार आहे.

दैनिक गोमन्तक

टिव्हीवरील प्रसिध्द मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये, जिथे जुने कलाकार शोला निरोप देत आहेत. तिथे काही नवीन लोक देखील शोमध्ये प्रवेश करत आहेत. अलीकडेच, तारक मेहता या शोच्या मुख्य पात्राने स्वतःला शोपासून दूर केले होते. दुसरीकडे, शो मजेदार करण्यासाठी निर्माते नवीन पात्र जोडून शो भरत आहेत. आता निर्मात्यांनी या शोमध्ये नवीन नट्टू काकांना आणले आहे. या शोच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून ही माहिती देण्यात आली. सोशल मीडिया वापरकर्ते या बदलीमुळे खूश नाहीत. दिवंगत स्टार घनश्याम नायक यांच्या निधनानंतर निर्मात्यांना या व्यक्तिरेखेबद्दल काळजी वाटत होती आणि आता त्यांना नवीन नट्टू काका मिळाल्याचे दिसते आहे आणि आता ते परत शो मध्ये येत आहेत. (taarak mehta ka ooltah chashmah 'new nattu kaka)

'तारक मेहता का उल्टा चष्मा' चे निर्माते असित कुमार मोदी यांनी एक व्हिडिओ रिलीज करून प्रेक्षकांना नवीन नट्टू काकांची ओळख करून दिली आहे. असित कुमार मोदी यांनी या व्हिडिओमध्ये (Video) म्हटले आहे की, 'जुन्या नट्टू काकांनी हा नवीन नट्टू काकांना पाठवला आहे. ज्याप्रमाणे तुम्ही त्याला तुमचे प्रेम द्यायचे, त्याचप्रमाणे तुम्ही नवीन नट्टू काकांनाही खूप प्रेम द्या. मात्र, या व्हिडिओमध्ये नट्टू काकांची (nattu kaka) भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचे नाव असित कुमार मोदी यांनी उघड केलेले नाही.

नट्टू काकांचे नाव किरण भट्ट आहे. किरण भट्ट हे गुजराती भाषेतील प्रसिद्ध अभिनेता-निर्माता-दिग्दर्शक आहेत. ही मालिका गेल्या 14 वर्षांपासून सब टीव्हीवर प्रसारित होत आहे. म्हणजेच या धमाल शोमध्ये पुन्हा एकदा काका-पुतण्याची जोडी चांगलीच रंगत आणताना दिसणार आहे. गडा इलेक्ट्रॉनिक्सही उघडले आहे, त्यामुळे नट्टू काकांशिवाय दुकान अपूर्ण आहे. आता या दुकानात नट्टू काका आणि बाघा दोघे मिळून जेठालालला खूप त्रास देतील, मग ते त्यांच्या सुख-दु:खाचे सोबतीही होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ganesh Chaturthi: 'दीपवती' नावाने ओळखले जाणारे, गोव्यातील सर्वांत मोठे गणेश मंदिर; 16 व्या शतकाच्या पूर्वार्धात स्थलांतरीत झाले..

Goa Crime: 'इन्स्टा'वरून युवतींची फसवणूक, 5 अजामीन वॉरंट, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा; अट्टल गुन्हेगाराची कोठडीत रवानगी

Goa Crime: सिंगापूरातून दिल्लीत उतरला, विमानतळावरच भामट्याला अटक; शिवोलीतील महिलेला घातला होता 1 कोटींचा गंडा

Goa Film Festival: 'कोकणीतून चित्रपट निर्मितीसाठी पुढे या'! CM सावंतांचे आवाहन; राज्य चित्रपट महोत्सवाचा थाटात समारोप

Goa CM Helpline: तुमच्या तक्रारी थेट CM सावंत ऐकणार, एका फोनवर प्रश्न सुटणार; 24x7 नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री हेल्पलाईन' सुरू

SCROLL FOR NEXT