Taapsee Pannu reacts on fan question related to IT raid In Kapil Sharma Show
Taapsee Pannu reacts on fan question related to IT raid In Kapil Sharma Show Dainik Gomantak
मनोरंजन

चाहत्याचा 'इन्कमटॅक्स रेड' वर प्रश्न, तापसीची भन्नाट प्रतिक्रिया

दैनिक गोमन्तक

कपिल शर्मा शोमध्ये (The Kapil Sharma Show) स्टार्स त्यांच्या चित्रपट आणि मालिकांच्या प्रमोशनसाठी येतात.आणि इथे आपल्या आवडत्या कलाकारांची मोठी धमाल पाहायला मिळते. अलीकडेच तापसी पन्नू (Taapsee Pannu) तिच्या 'रश्मी रॉकेट' (Rashmi Rocket) चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिलच्या शोमध्ये आली होती. तापसीचा रश्मी रॉकेट हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) प्रदर्शित झाला आहि आणि प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडलाहि आहे . चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सुप्रिया पाठक आणि प्रियांशु पैन्युली देखील तापसीसोबत आले होते.(Taapsee Pannu reacts on fan question related to IT raid In Kapil Sharma Show)

कपिल शर्मा शो मध्ये कपिलने एक नवीन सेगमेंट सुरू केले आहे ज्यात स्टार्सच्या सोशल मीडियातील फोटो वरील कमेंट्स वाचल्या जातात,आणि यात भन्नाट असे किस्से घडतात. असाच एक किस्सा तापसीसोबत देखील घडला आहे. ज्यावर तापसीने देखील तसेच उत्तर दिले आहे . एका चाहत्याने तापसीच्या फोटोवर टिप्पणी करताना लिहिले की , 'असे दिसते की आयकर विभागाच्या लोकांना काहीच मिळाले नाही, त्यामुळे अभिनेत्री उभी राहून हसत आहे.' ही कमेंट वाचल्यानंतर तापसीला हसू आवरता आले नाही.

खरं तर, मार्चमध्ये तापसी पन्नूवर आयकर विभागाकडून छापे टाकण्यात आले होते आणि तिच्यावर कर चोरीचा आरोप होता. मुंबई आणि पुण्यासह 30 ठिकाणी आयकर छापे टाकण्यात आले होते . तापसीच्या घरी आणि कार्यालयातही छापे टाकण्यात आले होते . तापसी व्यतिरिक्त अनुराग कश्यपच्या घरीही छापा टाकण्यात आला होता. यूजरच्या या कमेंटला उत्तर देताना तापसी म्हणाली, 'हे खूप चांगले आहे'.

अहवालांनुसार, या छाप्यादरम्यान तापसी पन्नूच्या घरातून 5 कोटी रुपये सापडल्याचे सांगण्यात आले होते . त्यानंतर तापसीने सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाली होती की तिला आश्चर्य वाटते की तिला पाच कोटी रुपये कोणी दिले? यासह तिने हे देखील सांगितले होते की मी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: 25 लाखांची सोन्याची बिस्किटे घेवून झाला फरार; पश्चिम बंगालमधून चोरट्याला अटक!

IndiGo Future Plan: इंडिगोचा मेगा प्लॅन, 100 छोटी विमाने ऑर्डर करण्याची एअरलाइन्सची तयारी

Dhargal Hit And Run Case: धारगळमध्ये तो अपघात नव्हे खूनच! उत्तर प्रदेशच्या दोघांना अटक

Lost From Beach: गोव्यात विविध बीचवरुन पाच मुले बेपत्ता; 'दृष्टी'ने घडवली कुटुंबियांशी पुन्हा भेट

Margao Session Court: वेश्याव्यवसायासाठी महिलांची खरेदी आणि पुरवठा केल्याप्रकरणी एकजण दोषी

SCROLL FOR NEXT