मनोरंजन

Sushant Singh Rajput Viral Video: सुशांत सिंह राजपूतच्या फ्लॅटला 2.5 वर्षांपासून मिळेना भाडेकरू; मालकाने ठेवली 'ही' अट

ज्या अपार्टमेंटमध्ये तो मृतावस्थेत आढळला त्या अपार्टमेंटला भाडेकरू मिळत नसल्याची माहिती आता समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. पण त्याच्याशी संबंधित गोष्टी आजही चर्चेत आहेत. 14 जून 2020 रोजी, त्याने त्याच्या मुंबई फ्लॅटमध्ये आत्महत्या केली. यानंतर सिनेसृष्टीत शोककळा पसरली.

ज्या अपार्टमेंटमध्ये तो मृतावस्थेत आढळला त्या अपार्टमेंटला भाडेकरू मिळत नसल्याची माहिती आता समोर आली आहे. हा फ्लॅट गेल्या अडीच वर्षांपासून रिकामाच असून त्यात कोणीही राहण्यास तयार नाही. आता या फ्लॅटच्या ब्रोकरने एक व्हिडिओ ट्विट केला आहे आणि सांगितले आहे की ते दरमहा 5 लाख रुपये भाड्याने उपलब्ध आहे. (Sushant Singh Rajput Mumbai Flat)

रफिक मर्चंट असे या ब्रोकरचे नाव आहे. या फ्लॅटचा मालक एनआरआय आहे. आता तो हा फ्लॅट कोणत्याही बॉलिवूड सेलिब्रिटीला भाड्याने देऊ इच्छित नाही. तो भाडेकरू म्हणून कॉर्पोरेट व्यक्ती शोधत आहे. त्याने सुशांत सिंह राजपूतच्या रिकाम्या घराचा संपूर्ण व्हिडिओ बनवला आहे आणि तो ट्विट केला आहे. त्याचा फोन नंबरही दिला आहे. हे समुद्रासमोर असलेले डुप्लेक्स 4BHK अपार्टमेंट आहे. या फ्लॅटचे महिना भाडे 5 लाख रुपये आहे.

सुशांत सिंगच्या घराला भाडेकरू मिळेना

सुशांत सिंह राजपूत या घरात मृतावस्थेत आढळला होता. तो गेल्यापासून हे घर असेच रिकामे पडले आहे. तिथे राहायला कुणीही तयार नाही. असं असलं तरी भाडं एवढं जास्त आहे की सामान्य माणूस एकदाही विचार करू शकत नाही. रफिक मर्चंटने या घराला नवीन भाडेकरू का मिळत नाहीत हे सांगितले.

इथे पाहा सुशांतच्या घराचा संपूर्ण व्हिडिओ :

सुशांतच्या घरात कुणाला का राहायचं नाही?

रफिक मर्चंट सांगतात की, 'लोक या फ्लॅटमध्ये राहायला घाबरतात. ज्या फ्लॅटमध्ये अभिनेत्याचा मृत्यू झाला तोच फ्लॅट असल्याचे भाडेकरूला कळल्यावर ते इथे राहायला नकार देतात. आजकाल अभिनेत्याच्या मृत्यूची बातमी जुनी झाल्याने लोक निदान फ्लॅट बघायला येत आहेत. मात्र करार अंतिम होत नाही. या घराच्या मालकालाही त्याचे भाडे कमी करायचे नाही. त्यामुळे लोक त्याच परिसरात इतर फ्लॅट खरेदी करण्यास प्राधान्य देतात.

रफिक पुढे म्हणाला, 'पार्टींना अगोदरच सांगितले जाते की ही ती जागा आहे जिथे सुशांत राहत होता. काही लोकांना इतिहासाची जाणीव नसते आणि त्यांना येथे राहायचे आहे परंतु त्यांचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य त्यांना करार करण्यास मनाई करतात. आता मालकाला तो फ्लॅट कोणत्याही सेलिब्रिटीला भाड्याने द्यायचा नाही, मग तो कोणीही असो किंवा तो कितीही मोठा असो. त्याला फ्लॅट एका कॉर्पोरेट व्यक्तीला द्यायचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

इतके भाडे देऊन सुशांत या फ्लॅटमध्ये राहत होता

सुशांतने डिसेंबर 2019 पासून सुमारे ₹4.5 लाख प्रति महिना भाड्याने अपार्टमेंट घेतले होते. तो कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान त्याच्यासोबत राहणाऱ्या त्याच्या रूममेट्स आणि गर्लफ्रेंड-अभिनेत्री रिया चक्रवर्तीसोबत अपार्टमेंट शेअर करत होता. मात्र ते गेल्यापासून हे घर रिकामे असून अजून कुणीही भाड्याने घेतले आहे. तो गेल्यापासून कोणीही राहायला आलेले नाही, अशी स्थिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पोर्तुगीजकालीन कागदपत्रे आता एका क्लिकवर! 'गोवा ऑनलाईन' पोर्टलवर सुरु होणार सर्वात मोठी डिजिटल सेवा; नागरिकांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचणार

खरी कुजबुज: युती तुटणार? की वाद मिटणार?

Maina Curtorim Mega Project Protest: सरपंच, सचिवावर कारवाई करा! मायणा-कुडतरी मेगा गृहप्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Goa Mega Project Protest: गावाचे गावपण नष्ट करु नका! दवंडे प्रकल्पाविरोधात स्थानिकांचा मडगाव पालिकेवर मोर्चा; 15 दिवसांत प्रकल्प रद्द करण्याचे निवेदन

CM Janjatiya Maje Ghar Yojana: आदिवासी बांधवांसाठी खूशखबर! ‘मुख्यमंत्री जनजातीय माझे घर’ योजना सुरु; आता तुमचे घर होणार हक्काचे आणि कायदेशीर

SCROLL FOR NEXT