Sapna Chaudhary Court Case: आपल्या बोल्ड डान्स मूव्ह आणि किलर अॅक्टने मने जिंकणारी हरियाणवी डान्सर सपना चौधरी आज कायद्याच्या कचाट्यात अडकली आहे. एका जुन्या प्रकरणामुळे सपना चौधरीने आत्मसमर्पण केले आहे. त्यानंतर तिला लखनौ कोर्टाने ताब्यात घेतले. सपना चौधरीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. सपना चौधरीला का ताब्यात घेण्यात आले, अखेर प्रकरण काय होते आणि पुढे काय होणार, जाणून घेऊया...
सपना चौधरीला लखनौ कोर्टाने ताब्यात घेतले
2018 मध्ये एका फसवणुकीच्या प्रकरणामुळे डान्सर सपना चौधरीला (Sapna Chaudhary) ताब्यात घेण्यात आले होते. या प्रकरणात आता सपनाने आत्मसमर्पण केले आहे. सोमवारी ती गुपचूप एसीजेएम-5 शंतनु त्यागी यांच्या खंडपीठासमोर पोहोचली, जिथे तिला हजर केले जाणार होते. या प्रकरणी सपनाविरुद्ध अटक वॉरंटही निघाले होते, मात्र काही वेळातच न्यायालयाने (Court) ते वॉरंट परत घेण्याचे आदेश जारी करुन सपनाचीही कोठडीतून मुक्तता केली.
2018 मध्ये या प्रकरणामुळे सपनाला ताब्यात घेण्यात आले होते
आता जर तुम्ही विचार करत असाल की, इतकं काय कारण होतं, तर 13 ऑक्टोबर 2018 रोजी सपना चौधरीचा एक शो आयोजित केला जाणार होता, ज्याची तिकिटे ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही विकली गेली होती. लोक या शोची चातकासारखी वाट पाहत होते, परंतु सपना शो साठी आलीच नाही. त्यामुळेच लोकांनी पैसे परत करण्याबाबत आवाज उठवला होता. यासाठी फिरोज खान या व्यक्तीने सपना चौधरी आणि आणखी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.