Sunny Leone Dainik Gomantak
मनोरंजन

Sunny Leone : डोक्यावरची ओढणी सांभाळत सनी लिओनी गेली लालबागच्या राजाच्या दर्शनाला...व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री सनी लिओनीने भारतीय पोषाखात लालबागच्या राजाला दर्शनासाठी हजेरी लावली, यावेळी सनीने डोक्यावर ओढणी घेत मनोभावे बाप्पाचं दर्शन घेतलं.

Rahul sadolikar

Sunny Leone At Lalbaugcha Raja Ganapati : अभिनेत्री सनी लिओनीला आता कोणत्याही वेगळ्या परिचयाची गरज नाही.

जिस्म 2, रागिणी MMS 2 या चित्रपटांमधून चाहत्यांच्या भेटीला आलेली सनी आता पूर्णत: भारतीय झाली आहे.

आपल्या अभिनय आणि सौंदर्याने चाहत्यांना वेड लावणारी सनी नुकतीच बाप्पाच्या दर्शनासाठी लालबागला पोहोचली होती.

सेलिब्रिटी आणि गणेशोत्सव

गणेश चतुर्थीला सामान्य नागरिकांप्रमाणेच सेलिब्रीटीही आपल्या घरी गणेशोत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा करतात.

शाहरुख खान, सलमान खान यांची गणेशभक्ती तर चाहत्यांना माहित आहेच ;पण इतर सेलिब्रिटींनीही लालबागच्या राजाला दर्शनाला हजेरी लावुन बाप्पाची प्रार्थना केली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी स्टार्सशी रीघ लागली होती. त्यात शाहरुख खानपासून ते शिल्पा शेट्टी, सनी लिओन अशा अनेक स्टार्सचा समावेश होता. 

सनी लिओनीने घेतले बाप्पाचे दर्शन

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतं की सनीचा पती डॅनियल गर्दीतून सनी लिओनीला बाप्पाकडे घेऊन जाताना दिसत आहे. 

दरम्यान, सनी डोक्यावरची ओढणी सांभाळत पूर्ण काळजी घेत बाप्पाच्या दर्शनाच्या पोहोचल्याचं दिसलं. 

गणेशाचं दर्शन घेताना त्याने भारतीय संस्कृतीची किती काळजी घेतली याबद्दल यूजर्सनी सोशल मिडीयावर सनीचं प्रचंड कौतुक केले आहे.

शिल्पा शेट्टीनेही घेतलं दर्शन

बाप्पाच्या दर्शनासाठी शिल्पा शेट्टीही आईसोबत लालबागला पोहोचली. या प्रसंगाचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे ज्यामध्ये ती बाप्पाच्या दर्शनासाठी पावसात छत्री घेऊन पुढे जाताना दिसत आहे.

उर्फी जावेदचीही हजेरी

उर्फी जावेदनेही (Urfi Javed at Lalbaugcha Raja) लालबागच्या राजाला भेट देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. त्याचवेळी 'बिग बॉस ओटीटी 2' चे विजेते एल्विश यादव आणि ईशा गुप्ता देखील बाप्पाच्या दर्शनासाठी त्यांच्यासोबत आले होते.

शाहरुख खानही बाप्पाच्या दर्शनासाठी

यापूर्वी 'जवान' चित्रपटात शाहरुख खानच्या आईची भूमिका साकारलेली रिद्धी डोगराही बाप्पाच्या दर्शनासाठी आली होती. 'जवान' अभिनेता शाहरुख खानही राजा गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी लालबागला पोहोचला. 

यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मॅनेजर पूजा ददलानीही दिसली. पूजासोबत तिची मुलगी होती आणि शाहरुख खानही अबरामसोबत तिथे पोहोचला होता.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT