Gadar 2 Vs Jailer Dainik Gomantak
मनोरंजन

कमी थिएटर मिळूनही रजनीकांतच सनीपेक्षा सरस ठरले...जेलरने केली इतकी कमाई

गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन विश्वात गदर 2 आणि जेलर या दोन चित्रपटांची जोरदार चर्चा सुरू आहे.

Rahul sadolikar

रजनीकांत यांच्या जेलरनं सनी देओलच्या गदर 2 ला चांगलीच टक्कर देण्यास सुरुवात केली आहे. 9 ऑगस्टला थलायवा रजनीचा जेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. तर 11 ऑगस्टला तब्बल 22 वर्षांनी सनीच्या गदर २ ने थिएटरमध्ये बाजी मारली. यासगळ्यात बॉक्स ऑफिसवर गदर 2 ने जेलर पिछाडीवर सोडल्याचे चित्र होते.

गदर 2 vs जेलर

आता एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे बॉक्स ऑफिसवर जेलर हा गदर २ ला चांगलीच लढत असल्याचे दिसून आले आहे. रजनी आणि सनी देओल हे पहिल्यांदाच बॉक्स ऑफिसवर एकमेकांसमोर आले आहेत.

याच दरम्यान बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा ओएमजी २ देखील प्रदर्शित झाला आहे. त्यालाही प्रेक्षकांनी पसंत केले आहे. तीनही चित्रपटांचे विषय वेगळे आहेत.

गदर आणि जेलर

गदर २ ची बऱ्याच वर्षांपासून प्रतिक्षा होती. सुपरस्टार रजनीकांत यांचा देखील दोन वर्षांनी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यासगळ्यात बॉक्स ऑफिसवर दोन्ही चित्रपटांमध्ये जोरदार फाईट होती. जेलरच्या तुलनेत सनीच्या गदर २ ला स्क्रिन्स जास्त मिळाल्या होत्या. गदर २ चे स्क्रिन टाईम्स देखील वाढवण्यात आले होते. जेलरला मात्र थिएटरसाठी वाट पाहावी लागत होती.

जेलर ठरला सरस

या सगळयात रजनीच्या जेलरनं गदर 2 ला मागे ढकलले आहे. त्यानं आतापर्यत पाचशे कोटींचा टप्पा पार केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. गदरनं 470 कोटींपर्यत मजल मारल्याची माहिती आहे.

दोन्ही चित्रपटांमध्ये फारसा फरक नसला तरी आगामी काळात रजनीचा जेलर अधिक कमाई करेल असा अंदाज बांधला जात आहे. रजनीचा फॅन बेस, कथेतील नाविन्य, हटके स्टाईल, म्युझिक यामुळे अनेकजण रजनीचा जेलर पाहण्यास प्राधान्य देत आहेत.

थलैवाचा चित्रपट आणि चाहत्यांचा उत्साह

जेलर प्रदर्शित होऊन दहा दिवस झाले असून त्यानं विक्रमी कमाई केली आहे. थलायवाचा कोणताही चित्रपट असल्यास तो पाहण्यासाठी साऊथमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण असते. त्याच्या चित्रपटांना मिळणारा प्रतिसादही उत्तम असतो.

जेलरनं दहा दिवसांत पूर्ण जगभरातून पाचशे कोटींची कमाई केली आहे. ट्रेड अनालिस्ट मनोबाला विजय बालननं दिलेल्या माहितीनुसार जेलर ही 2.0 आणि पोनियन सेल्वन 1 नंतर पाचशे कोटींची कमाई करणारी तिसरी तमिळ फिल्म झाली आहे.

जेलरची कमाई

सॅकनिकनं दिलेल्या माहितीनुसार, जेलरनं दहा दिवसांत सगळ्याच भाषांमध्ये १८ कोटींची कमाई केली आहे.जेलर हा पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

येत्या काळात हा चित्रपट आणखी विक्रमी कमाई करण्याचा अंदाज ट्रेड अॅनालिस्टनं वर्तवला आहे. जेलरनं पहिल्याच दिवशी ४८.३५ कोटींची कमाई केली होती. भारतात या चित्रपटानं २६३ कोटींची कमाई केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Third District: गोव्यात तिसरा जिल्हा झाल्यावर 'सरकारी कामे' वेळेत होणार का? की नोकऱ्यांत ओळखीची लोकं घुसणार..

Goa Court: गोव्यात अडीच वर्षांत 9727 खटले निकाली! फास्‍ट ट्रॅक कोर्टात 1504 खटले प्रलंबित

Goa Assmbly Live: जुने गोवेतील चर्चमध्ये 'ड्रेसकोड'ची सक्ती हवी!

Rapan Fishing: चौथीच्या विद्यार्थ्यांनी ओढली रापण! होडी खेचून आणली किनाऱ्यावर; शाळेचा अभिनव उपक्रम

Government Job: लांबच लांब रांगा, वाहतूक कोंडी आणि गोंधळ! 100 पदांसाठी हजारोंची गर्दी, तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT