अभिनेता सनी देओल सध्या त्याच्या गदर 2 या चित्रपटामुळे चर्चेत आहे. गदरने बॉक्स ऑफिसवर 450 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.
चित्रपटाच्या कलेक्शनसोबत सनी आणि अमीषाच्या ऑनस्क्रीन जोडीची चर्चा सोशल मिडीयावर आहे. चित्रपटाच्या रिलीजनंतरही सनी देओलने चित्रपटाचं प्रमोशन सुरूच ठेवलं आहे.
धर्मेंद्रच्या आईने एकदा एका नोकराला शिवीगाळ केल्याबद्दल धर्मेंद्र यांना कसे खडे बोल सुनावे होते याचा किस्सा सांगितला आहे. हा किस्सा धर्मेंद्र यांचा मोठा मुलगा आणि अभिनेता सनी देओलनेच सांगितला आहे.
आपल्या आजीसोबतच्या आठवणी शेअर करताना सांगितले की आजीचा त्याच्यावर खूप प्रभाव होता. 'रणवीर शो'मध्ये सनी बोलत होता. यावेळी सनीने त्याचे बालपणीच्या आठवणी आणि अनुभव सांगितले.
आपल्या या मुलाखतीत बोलताना सनीने असेही सांगितले की त्याचे बालपण मजेशीर होते, तो नेहमी खेळण्यात गुंग असायचा आणि घरी परतल्यावर त्याची आई त्याला मारहाण करायची. त्या काळातील बहुतेक मुलांप्रमाणे, सनीलाही खेळताना दुखापत झाल्यामुळे आईकडुन ओरडा खावा लागला होता.
सनी म्हणाला आजीचा माझ्यावर खूप प्रभाव पडला आहे. ती खूप उदार स्त्री होती. चूक झाली तर ती खरडपट्टी काढायची. मला आठवतं, एकदा माझ्या वडिलांनी नोकरावर रागावून त्याला शिवीगाळ केली होती. माझ्या आजीने हे ऐकलं, आणि ती चिडली. तिने नोकराला बोलावून सांगितले 'तू भी गाली दे (तुही त्याला शिवीगाळ कर)'.
. हे असे लोक आहेत ज्यांच्याभोवती मी वाढलो आहे; माझे आजोबा, माझी आजी, माझी आई. मी नेहमी म्हणतो की तुम्ही जिथे वाढता, तुमचे कुटुंब काय आहे याचे उत्पादन मूल आहे.”
वडिलांनी त्याला कधी फटकारले का असे विचारले असता, धर्मेंद्रने त्याला एकदा थप्पड मारल्याची आठवण सनीने सांगितली. "माझ्या चेहऱ्यावर तीन बोटांचा शिक्का उठला होता, इतर मुलांप्रमाणे मी खोडकर गोष्टी केल्या. असं सनीने ही आठवण सांगताना म्हटले...
एके दिवशी माझ्या वडिलांनी मला पकडले आणि तोंडावर चापट मारली. नंतर त्यांना खूप वाईट वाटले. , आजी आणि आई त्यांच्यावर रागावले होते असंही सनीने सांगितले. सनी पुढे म्हणाला की त्याचे वडील नेहमी खूप व्यस्त असायचे आणि तीन शिफ्टमध्ये काम करायचे.
सनीचा, गदर 2, 2023 चा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनण्यासाठी शाहरुख खानच्या पठाणशी स्पर्धा करत आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित, गदर 2 गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला आणि आता ₹ 500 कोटींच्या आसपास देशांतर्गत कलेक्शनच्या जवळपास आहे.