Sunny Deol on Nepotism: बॉलीवूडचा अभिनेता सनी देओल गदर २ मुळे नाही तर आपल्या मुलांमुळे चर्चेत आहे. त्याच्या मुलाने राजवीरने दोनो या चित्रपटातून डेब्यू केले आहे.
सूरज बडज्यात्याचा मुलगा अविनाश बडजात्यानेदेखील या चित्रपटातून दिग्दर्शनात डेब्यू केले आहे.
आता एका मुलाखतीदरम्यान, नेपोटिझमबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. एक बाप आपल्या मुलांचा विचार नाही करणार तर कोण करणार असेही सनीने म्हटले आहे.
सनी देओल म्हणतो, बराच काळ मला नेपोटिझमबद्दल बराच काळ काही माहीत नव्हते. मग मी यावर विचार केला तर मला वाटते नेपोटिझम या शब्दाला काही अर्थ नाही.
जर बाप आपल्या मुलासाठी हे करणार नाही तर कोण करेल? अभिनय असो किंवा इतर कोणताही उद्योग, प्रत्येक वडील आपल्या मुलाचे जीवन सुखकर कसे बनवायचे याचा विचार करतो.
नेपोटिझम हा शब्द बहुतेक ते लोक वापरतात ज्यांना काही कारणाने आयुष्यात यश मिळाले नाही. हा शब्द ते आपली निराशा व्यक्त करण्यासाठी वापरतात, नेपोटिझम या शब्दाला काही अर्थ नाही असे सनी( Sunny Deol)ने नेपोटिझमबद्दल बोलताना म्हटले आहे.
आपल्या कुटुंबाबद्दल बोलताना तो म्हणाला, 'माझ्या वडिलांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आज मी, बॉबी किंवा अभय जे काही आहोत ते आमची स्वतःची ओळख आहे.
बाप होणं म्हणजे काय ते मला माहीत असलं तरी त्यांची वेदना समजून घेतली तरी राजवीरचा प्रवास हा त्याचाच प्रवास आहे. त्याच्या करिअरसाठीच त्यालाच प्रयत्न करायचे आहेत.
दरम्यान, सनी देओलचा मोठा मुलगा करण देओलने 'पल पल दिल के पास' मधून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती आणि आता राजवीरने 'दोनो' या चित्रपटातून पदार्पण केले आहे.
हा चित्रपट( Movie ) सूरज बडजात्या यांचा मुलगा अवनीश बडजात्या याने दिग्दर्शित केला असून हा त्याचा पहिला चित्रपट आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.