Israel Palestine War: '...तर तुम्ही पाखंडी आहात' इस्राइल हल्ल्याबाबत स्वरा भास्करचे मोठे वक्तव्य

Israel Palestine War: हा हल्ला पाहून हॉलिवूडलाही धक्का बसला असून त्यांनी याचा तीव्र निषेध केला आहे.
Swara Bhasker on Israel Palestine War
Swara Bhasker on Israel Palestine WarDainik Gomantak
Published on
Updated on

Israel Palestine War: सध्या इस्राइलवर झालेला आंतकी हल्ल्याचे संपूर्ण जगभरात पडसाद उमटलेले दिसून येत आहेत.

हमासच्या हल्ल्यात अनेक इस्राइली आणि पॅलेस्टाइनच्या नागरिकांनी आपला जीव गमावला आहे.

हमासच्या अचानक झालेल्या हल्ल्यानंतर इस्राइलने आता युद्ध सुरु होणार असल्याचे म्हटले आहे. आता याच पार्श्वभूमीवर बॉलीवू़डचे सेलिब्रिटीदेखील व्यक्त होताना दिसत आहेत.

सोशल मिडियावर बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर( Swara Bhasker )ने यावर भाष्य केले आहे.

'इस्राइलने केलेले पॅलेस्टिनवरील अत्याचार, पॅलेस्टिन नागरिकांच्या घरांवर जबरदस्तीने कब्जा, त्यांना जबरदस्तीने घरातून बेदखल करणे, इस्रायली स्थायिकांची कट्टरता आणि हिंसाचार, पॅलेस्टिनी मुले आणि किशोरवयीन मुलांची हत्या पाहून तुम्हाला धक्का बसला नसेल.

तर आता तुम्हाला इस्राइलमधील चित्र पाहून वाईट वाटणे हे तुम्ही पाखंडी आणि दांभिक असल्याचे लक्षण आहे.

Swara Bhasker on Israel Palestine War
Mia Khalifa On Israel: इस्त्रायल-हमास संघर्षात मिया खलिफाने केली पोस्ट; सोशल मीडियात खळबळ...

याबरोबरच, अभिनेत्री कंगना रणौतदेखील यावर व्यक्त होताना दिसली आहे. एका इस्रायली महिला सैनिकाचा मृतदेह ट्रकमध्ये फिरवल्याच्या व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. याने माझ्या 'याने माझे लाखो तुकडे केले आहेत.

माझे हृदय इस्रायल( Israel ) आणि तेथील मुली आणि महिलांसाठी धडकत आहे. प्रत्येक शहीद सन्माननीय मृत्यूस पात्र आहे.

Kangana Ranaut Social Media
Kangana Ranaut Social MediaDainik Gomantak

हा हल्ला पाहून हॉलिवूडलाही धक्का बसला असून त्यांनी याचा तीव्र निषेध केला आहे. 'वंडर वुमन' फेम अभिनेत्री गॅल गॅडॉटने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले की, 'मी इस्रायलसोबत आहे.'

आता हे युद्ध हिंसाचार, युद्धजन्य परिस्थिती कधी सामान्य होणार हे पाहणे महत्वाचे आहे. दरम्यान, स्वरा भास्करच्या या पोस्टची चांगलीच चर्चा रंगली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com