Sunny Deol on Dharmendra Dainik Gomantak
मनोरंजन

Sunny Deol On Dharmendra: मी माझ्या वडीलांना 'त्या'बद्दल कसे विचारु? धर्मेंद्रच्या इंटिमेट सीनवर सनी म्हणाला...

Sunny Deol On Dharmendra: माझे वडील काहीही करु शकतात.

दैनिक गोमन्तक

Sunny Deol On Dharmendra: आपल्या अभिनयासाठी लोकप्रिय असणारे देओल कुटुंब सध्या बॉक्स ऑफीसवर वर्चस्व गाजवताना दिसत आहे. सनी देओलचा बहुचर्चित चित्रपट गदर 2 लवकरच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

यादरम्यान सनी देओलचे वडील आणि चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटातून प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे.

करण जोहरने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या किसिंग सीनची चांगलीच चर्चा रंगली होती. या चर्चेत काहींनी वयावरुन टीकाही केली होती तर काहींनी कौतुकदेखील केले होते. आता सनी देओलने धर्मेंद्रच्या किसिंग सीनवर आपले मत व्यक्त केले आहे.

मी अजून चित्रपट पाहिला नाही मात्र मला माहीत आहे की, माझे वडील काहीही करु शकतात. मी माझ्या वडीलांना याबद्दल कसे विचारु? त्यांचे स्वत:चे असे एक व्यक्तीमत्त्व आहे ज्यामध्ये प्रामाणिकपणा आणि नम्रपणा भरलेला आहे. त्यामुळे ते काहीही करु शकतात. पुढे सनी देओलने म्हटले आहे की, मी स्वत:चेच कमी चित्रपट बघतो, त्यामुळे धर्मेंद्रचा हा चित्रपट अजून तरी पाहिला नाही.

दरम्यान, याआधी धर्मेंद्रलादेखील या किसिंग सीन बद्दल विचारणा करण्यात आली होती. तेव्हा त्यांनी अगदी मजेशीर शैलीत उत्तर दिले होते. जेव्हा जेव्हा मला चान्स मिळतो तेव्हा तेव्हा मी सिक्सर मारतो. त्यामुळे मी मिळालेला चान्स घालवला नाही असे त्यांनी या चित्रपटातील सीनवरुन म्हटले होते.

अजूनही बॉक्स ऑफीसवर रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट चांगले कलेक्शन करत आहे. आलिया आणि रणवीर सिंग यांची मुख्य भुमिका असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. आता सनी देओलच्या गदर2 प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

आता प्रेक्षकांच्या अपेक्षा गदर2 पूर्ण करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 11ऑगस्टला हा चित्रपट चित्रपटगृहात रिलिज होणार असून त्याच दिवशी अक्षय कुमारचा ओह माय गॉड 2 देखील रिलिज होणार आहे. त्यामुळे कोणता चित्रपट प्रेक्षकांंचे मन जिंकून घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

SCROLL FOR NEXT