Dimple Kapadia Dainik Gomantak
मनोरंजन

Dimple Kapadia Watched Gadar2: सनी देओल की अक्षय कुमार; डिंपल कपाडियाने कोणाला निवडले?

Dimple Kapadia Watched Gadar 2: सनी देओल आणि डिंपल कपाडिया मुंबई एअरपोर्टवर एकाचवेळी परंतु वेगवेगळे दिसून आले होते.

दैनिक गोमन्तक

Dimple Kapadia Watched Gadar 2: बॉलीवूडची दिग्गज अभिनेत्री डिंपल कपाडिया आपल्या अभिनयासाठी ओळखली जाते. आता मात्र ही लोकप्रिय अभिनेत्री सनी देओलमुळे चर्चेत आली आहे.

सनी देओलचा गदर 2 चित्रपट हा मोठी कमाई करताना दिसत आहे. गदरप्रमाणेच गदर 2 लादेखील प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळताना दिसत आहे. अवघ्या 12 दिवसात या चित्रपटाने 399.60 कोटींची कमाई केली आहे. फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात या चित्रपटाला प्रेक्षकांची गर्दी दिसून येत आहे. मोठ्या काळाच्या गॅपनंतर बॉलीवूडमध्ये कमबॅक करणाऱ्या सनी देओलने नवीन विक्रम रचला आहे.

आता सनी देओलमुळे डिंपल कपाडिया कशी चर्चेत आली असा प्रश्न अनेकांना पडला असेल. चला जाणून घेऊयात नक्की काय प्रकरण आहे. आता तारा सिंग आणि सकीनाच्या गदर २ची स्क्रिनिंग लंडनमध्ये झाली आहे.

सध्या डिंपल कपाडिया लंडनमध्ये आहे. Gaiety Galaxy मध्ये अभिनेत्री दिसून आली आहे. येथून बाहेर पडताना पापाराझींच्या फोटोसाठी त्यांनी नाही म्हटले. व्हाईट शर्ट, ब्लॅक पँट आणि हॅटमध्ये अशा लूकमध्ये दिसून आलेली डिंपल कपाडियाचा व्हिडिओ मात्र चांगलाच व्हायरल झाला आहे.

महत्वाचे म्हणजे, काही दिवसांपूर्वीच सनी देओल आणि डिंपल कपाडिया मुंबई एअरपोर्टवर एकाचवेळी परंतु वेगवेगळे दिसून आले होते. ते दोघेही लंडन( London )ला गेल्याची चर्चा होती. त्यामुळे आता डिंपल कपाडिया सनी देओलचा गदर 2 हा चित्रपट पाहून आल्याचे म्हटले जात आहे.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक कंमेट केल्या आहेत. नक्की कोणाचा चित्रपट पाहिला? जावयाचा ओएमजी 2 कि सनी देओलचा गदर 2 ?

दरम्यान, एकेकाळी सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांचे नाते मोठ्या चर्चेचा विषय होता. दोघांच्या नात्याच्या अनेक चर्चा आजही होताना दिसतात. मात्र या दोन्ही कलाकारांनी यावर कधीच कोणतेही भाष्य केले नाही.

आता सनी देओलचा गदर 2 ने बॉलीवूडला जूने दिवस दाखवले आहेत. कोरोनानंतर बॉलीवूडचे चित्रपट बॉक्स ऑफीसवर कमाई कऱण्यात अपयशी ठरत होते. सनी देओलचा गदर 2 या सगळ्याला अपवाद ठरला आहे.

प्रेक्षकांनी त्यांच्या चित्रपटाला भरभरुन प्रतिसाद दिला आहे. याबरोबरच, चित्रपटाच्या निमित्ताने कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याची आयुष्याच्या चर्चांना पून्हा उधान येताना दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मनोज परबांच्या कार्यकर्त्यावर मंत्री नीलकंठ हळर्णकर धावून गेले; कोलवाळमध्ये आरजी आणि भाजप समर्थक आमने-सामने Watch Video

Harus Rauf Controversy: रौफला '6-0' आणि 'प्लेन क्रॅश'ची नक्कल भोवली! फायनलआधी 'ICC'नं केली कारवाई, भारताशी पंगा घेणं पडलं भारी

नवरात्र, वाघ, हिंदू आणि अभयारण्य! गोव्यात व्हिडिओवरुन वाद; सामाजिक कार्यकर्त्याला धमकी देणाऱ्या भाजप नेत्यावर अखेर गुन्हा

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

SCROLL FOR NEXT