Suniel Shetty Dainik Gomantak
मनोरंजन

Suniel Shetty: बॉलीवूडचे आण्णा टोमॅटोवर बोलले अन् ट्रोल झाले; मी हॉटेल व्यवसायात...

Suniel Shetty: मात्र या सर्वाचा परिणाम माझ्यावर देखील होतो.

दैनिक गोमन्तक

Suniel Shetty: बॉलीवूडचे आण्णा अर्थात सुनिल शेट्टी आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. सुनिल शेट्टी आपल्या वैयक्तित आयुष्यामुळे देखील चर्चेचा विषय बनत असतो. आता मात्र त्याने टोमॅटोबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मिडियावर सुनिल शेट्टीला ट्रोल केले जात आहे.

गेल्या काही दिवसापासून टोमॅटोचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना फटका बसल्याचे म्हटले जात आहे. आता यातच सुनिल शेट्टीने टोमॅटोच्या दरवाढीवर प्रतिक्रिया दिली होती.

एका मुलाखती दरम्यान, टोमॅटोच्या वाढत्या किमतीचा परिणाम आम्हा कलाकरांवरही होतो. टोमॅटोचे दर वाढल्यामुळे त्याच्या स्वयंपाकघरात टोमॅटोचा वापर कमी झाल्याचं सुनिल शेट्टीने म्हटले होते.

याबरोबरच, मी स्वत: कमी टोमॅटो खात आहे. मी अभिनेता असल्यानं माझ्यावर याचा परिणाम होत नसावा अनेकांना वाटतं. मात्र या सर्वाचा परिणाम माझ्यावर देखील होतो असं सुनिल शेट्टींनी म्हटलं होतं.

सुनिल शेट्टींच्या या विधानावरुन त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. सोशल मिडियावर सुरु असलेल्या मोठ्या ट्रोलिंग नंतर सुनिल शेट्टीने आपण केलेल्या वक्तव्यावर माफी मागत स्पष्टीकरण दिले आहे.

शेतकऱ्यांना अशा प्रकारे दुखावण्याचा मी विचार करु शकत नाही. मी बोललेल्या शब्दांचा चूकीच्या पद्धतीने अर्थ काढला गेला आहे. मी हॉटेल व्यवसायात असल्याने माझा शेतकऱ्यांशी नेहमीच संबंध येतो.

त्यामुळे मी त्यांच्या भावना दुखावल्या जातील अशा प्रकारचे बोलणे शक्य नाही. पण तरीही माझ्या कोणत्या वक्तव्यामुळे माझ्या शेतकरी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो. पुढे या विषयावर मला काहीही बोलायचे नाही असेही सुनिल शेट्टीने म्हटले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सुनिल शेट्टीने एका मुलाखतीदरम्यान आपली मुलगी अथिया आणि जावई राहुल यांना नात्याविषयी एक खास सल्ला दिला होता. आथियाला एक बेस्ट पार्टनर होण्यासाठी त्यांनी आपल्या जोडीदारावर विश्वास ठेवायला सांगितले होते.

तर राहुलला तू इतकाही चांगला होऊ नकोस की तुझ्या चांगुलपणाचा लोक फायदा घेतील असे सुनिल शेट्टीने आपल्या मुलांना सल्ला देताना म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'व्याघ्र प्रकल्प नको' भूमिका चुकीची! खाणींसारखाच हाही गोव्याच्या हिताचा लढा - संपादकीय

Goa Politics: साडेतीन तास चर्चा,पण निर्णय नाहीच! काँग्रेसच्या युतीला 'आरजी'चा अडथळा; जागावाटप अधांतरी

Goa Politics: खरी कुजबुज; काँग्रेसला भीती उमेदवार चोरीची?

Goa Fraud Case: बनावट 'आयपीओ'चे आमिष; ज्येष्ठाची 4 कोटींची फसवणूक, कोल्हापूर येथून संशयिताला अटक

Goa Live News: 56th IFFI ईफ्फीत दिसलो सनी देवोलाचो हमशकल; Watch Video

SCROLL FOR NEXT