Sumona Chakravarti Dainik Gomantak
मनोरंजन

Sumona Chakravarti: १७ वर्षात पहिल्यांदाच मिळाला अवॉर्ड! अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना; म्हणाली, तुम्ही काहीही म्हणा...

Sumona Chakravarti: कपिल शर्मा शो, संपूर्ण कलाकार आणि क्रू, सोनी टीव्ही आणि इतरांचे आभार मानले.

दैनिक गोमन्तक

Sumona Chakravarti: 'द कपिल शर्मा कॉमेडी शो' प्रेक्षकांचा लाडका आणि आवडता शो आहे. या शोमधील पात्रेदेखील प्रेक्षकांची लाडकी आहेत. आता कपिलच्या बायकोच्या पात्रातून प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करणाऱ्या सुमोना चक्रवर्तीला तिच्या या भूमिकेसाठी सन्मानित केले आहे.

गेल्या १७ वर्षात तिला मिळणारा हा पहिला पुरस्कार आहे. अभिनेत्रीने हा आनंद आपल्या प्रेक्षकांबरोबर सोशल मिडियावर पोस्ट लिहित शेअर केला आहे. याशिवाय पुरस्कार स्वीकारताना त्याने इंस्टाग्रामवर एक क्लिपही शेअर केली आहे. अर्चना पूरण सिंग, किकू शारदा यांच्यासह इतर कलाकारांनीही या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सुमोना चक्रवर्तीने पोस्टवर एक लांबलचक नोट लिहिली आहे. फोटो आणि क्लिपही शेअर केली आहेत. त्याने लिहिले, 'मी काल रात्री एक पुरस्कार जिंकला. ITA अवॉर्ड्समध्ये कपिल शर्मा शोसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री फिमेल कॉमेडी (ज्युरी). माझा पहिला विजय, 17 वर्षांपूर्वी अभिनय सुरू केल्यानंतर माझा पहिला पुरस्कार. तुम्ही काहीही म्हणा, आम्ही सर्वजण प्रशंसा आणि आदरासाठी भुकेले आहोत.

सुमोनाने पुढे लिहिले की, 'मला वाटतं कार्यक्रमस्थळी ५-७ सेकंद शांतता होती कारण लोकांना वाटलं की मी बोलेन. मला जे वाटत होते ते व्यक्त केले. कपिल शर्मा शो, संपूर्ण कलाकार आणि क्रू, सोनी टीव्ही आणि इतरांचे आभार मानले.

गेल्या 10 वर्षात प्रत्येकाने खूप मेहनत केली आहे. मला जगभरातील सर्व लोकांचे प्रेम मिळाले आहे. लोकांनी प्रशंसा केली आहे. यासाठी मी सर्वांचे आभार मानू इच्छिते आणि मी त्यांची ऋणी आहे. असे म्हणत अभिनेत्रीने सर्वांचे आभार मानले आहेत. अभिनेत्रीने पुरस्कार मिळाल्यावर अशाप्रकारे आपला आनंद व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT