बॉलिवूड विरुद्ध साऊथ हा वाद सिनेसृष्टीत वाढत चालला आहे. एकीकडे विजय देवरकोंडा, रश्मिका मंदान्ना, विजय सेतुपती यांसारखे साऊथचे सुपरस्टार बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. तर दुसरीकडे, हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्याच्या प्रश्नावर दक्षिण चित्रपटसृष्टीतील काही कलाकार भडकले आहेत. अलीकडेच, मेजर चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी महेश बाबू म्हणाला की, 'मला बॉलिवूडमधून अनेक ऑफर येत आहेत, पण बॉलिवूडला मी परवडणार नाही.' महेश बाबूच्या या विधानाने बॉलिवूड विरुद्ध दक्षिण सिनेसृष्टी वाद पेटला आहे. (South superstars surpass Bollywood stars in fees)
आजकाल बॉक्स ऑफिसवर साऊथ सिनेमे अधिराज्य गाजवत आहेत. मानधनाच्या बाबतीतही साऊथ सुपरस्टार बॉलिवूड कलाकारांच्या पुढे आहेत.
प्रभास
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभास 'आदिपुरुष' चित्रपटासाठी सुमारे 150 कोटी रुपये आणि 'स्पिरीट' चित्रपटासाठी 125 कोटी रुपये मानधन घेत आहे.
विजय
चित्रपटसृष्टीतील मोठे नाव असलेल्या थलपथी विजयला त्याच्या शेवटच्या चित्रपटासाठी 80 कोटी रुपयांपेक्षा जास्त मानधन मिळाले होते आणि ताज्या वृत्तानुसार, त्याच्या पुढच्या 'बीस्ट' चित्रपटासाठी सुमारे 120 कोटी रुपये मानधन मिळण्याची अपेक्षा आहे.
अल्लू अर्जुन
'पुष्पा' सुपरस्टार, जो एका चित्रपटासाठी 20 ते 22 कोटी रुपये मानधन घेत होता, त्याने पुष्पाच्या दोन भागांसाठी सुमारे 60 कोटी रुपये आकारले. ताज्या वृत्तानुसार, अल्लू अर्जुनला पुढील चित्रपटासाठी 100 कोटींहून अधिक मानधन मिळण्याची शक्यता आहे.
महेश बाबू
टॉलीवूडचा राजकुमार, महेश बाबू, एका चित्रपटासाठी सुमारे 55 कोटी रुपये घेत होता. ताज्या अहवालानुसार, आता त्याने आपली फी 80 कोटींहून अधिक केली आहे.
राम चरण
टॉलिवूडचा स्टार एका चित्रपटासाठी सुमारे 35 कोटी रुपये आकारतो. RRR चित्रपटसाठी त्याने 43 कोटी रुपये घेतले, अशी माहिती आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.