साऊथ सुपरस्टार धनुषने (Dhanush) त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव जाहीर केले आहे. या अभिनेत्याने त्याच्या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर (Title Motion Poster) त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करून चित्रपटाच्या शीर्षकाची घोषणा केली. या चित्रपटाच्या बॅकग्राउंडला फक्त संगीत दिले आहे. या चित्रपटाचे नाव आहे सर SIR असून हा चित्रपट एका सामाजिक विषयावर आधारित आहे.
चित्रपटाचे शीर्षक जाहीर करण्यापूर्वीच धनुषने त्याच्या ट्विटरवर एक पोस्टर शेअर केले होते. ज्यामध्ये त्याने चित्रपटाशी संबंधित काही तपशील शेअर केला होता. धनुषचा हा पहिला तेलुगु दिग्दर्शनाचा चित्रपट आहे. हा चित्रपट तमिळ आणि तेलुगू भाषेत बनवला जाणार आहे. अभिनेता धनुष त्याच्या तामिळ वर्जनमध्ये मुख्य कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.
“माझा पुढचा तामिळ चित्रपट आणि माझा पहिल्या तेलुगु दिग्दर्शीत चित्रपटाच्या नावाची घोषणा उद्या करणार ओम नम: शिवाय" असे कॅप्शन धनूशने ट्विटरवर पोस्टर शेअर करताना दिले.
या शीर्षक नसलेल्या प्रकल्पाचे लेखन आणि दिग्दर्शन वेंकी अतुलुरी यांनी केले आहे. सीतारा एंटरटेनमेंटचे एस नागा वामसी धनुषच्या पुढील चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. या सोशल पीरियड ड्रामामध्ये शिक्षण माफिया दाखवण्यात येणार आहेत. या चित्रपटात एक तरुण शिक्षणाच्या खाजगीकरणाविरोधात लढा देताना दिसणार आहे.
धनुष 'अतरंगी रे'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त
सध्या धनुष त्याचा आगामी चित्रपट 'अतरंगी रे'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट आनंद एल राय यांनी दिग्दर्शित केला आहे. चित्रपटात धनुषसोबत सारा अली खान आणि अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या तमिळ वर्जनचे नाव गलाट्टा कल्याणम (Galatta Kalayanam)असे आहे. 'अतरंगी रे'चे संगीत ए. आर रहमान यांनी दिली आहे. हा चित्रपट 24 डिसेंबरला OTT वर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी आणि तमिळ भाषेत प्रदर्शित होणार आहे. याआधी 8 वर्षांपूर्वी धनुष 'रांझना'मध्ये दिसला होता.
धनुष 'द ग्रे मॅन' या हॉलिवूड चित्रपटातही दिसणार आहे. या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शन अँथनी आणि जो रुसो यांनी केले आहे. हा चित्रपट 2009 मध्ये मार्क ग्रेनी नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटात रायन गोसलिंग, ख्रिस इव्हान्स, जेसिका हेनविक आणि इतर कलाकार दिसणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.