Sai Pallavi Bollywood Debut: दक्षिण भारतीय अभिनेत्री साई पल्लवी ही बॉलीवुडमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे. साई पल्लवी ही दक्षिणेतील आघाडीची अभिनेत्री असून तिची स्वतःची अशी एक स्वतंत्र फॅन फॉलोविंग संपुर्ण देशभरात आहे. त्यामुळेच तिच्या बॉलीवुडमधील पदार्पणाकडे अनेकांचे लक्ष्य लागून राहिले आहे.
साई पल्लवीचे अनेक चित्रपट मूळ दाक्षिणात्य भाषेतच हिंदी पट्ट्यातील हजारो प्रेक्षकांनीही पाहिले आहेत. तिच्या 'प्रेमम' या चित्रपटात तिने साकारलेली 'मलर'ही भुमिका प्रचंड गाजली. मलर म्हणूनच चाहत्यावर्गाती प्रसिद्ध आहे. गालांवर मुरूमे असलेली आणि ते न लपविणारी अभिनेत्री म्हणूनही ती ओळखली जाते. तिने त्वचा गोरी करणाऱ्या क्रीमची जाहीरातही नाकारली होती. अशा सिनेमाबाह्य गोष्टींसह तिच्या अॅक्टिंग, अॅटिट्युडसाठी साई पल्लवीवर प्रेम करणारा एक मोठा वर्ग भारतात आहे.
सध्या देशात पॅन इंडिया चित्रपटांचा काळ सुरू आहे. त्यामुळे बडे चित्रपट देशात एकाचवेळी रीलीज केले जात आहेत. तसेच हिंदी चित्रपट, वेबसीरीज दक्षिण भारतीय भाषांमध्येही डब केले जात आहेत. किंवा तिकडचे चित्रपट हिंदीत येत आहेत. मुळात प्रेक्षकच आता ग्लोबल होऊ लागले आहेत. अशातच निर्माता अल्लू अरविंद यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या रामायण या चित्रपटाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, 2019 मध्ये रामायणावर आधारीत या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून या चित्रपटातील स्टारकास्टबाबत विविध अफवा व्हायरल होत असतात. आता अभिनेत्री साई पल्लवी (Saipallavi Senthamarai) या 'रामायण' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या चित्रपटात साई ही सीतेची भुमिका साकारू शकते.
या चित्रपटातील भुमिकांसाठी रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोनच्या नावाचाही विचार सुरू आहे. निर्मात्यांनी दीपिकाशी संपर्क साधल्याचे सांगितले जात आहे. पण जोपर्यंत प्रत्यक्ष चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात होत नाही, तोपर्यंत काहीही निश्चित्तपणे सांगता येणार नाही. कारण चित्रपटाशी संबंधित कुणीही या चित्रपटाच्या घडामोडींबाबत अधिकृतरित्या काहीही माहिती दिलेली नाही. यापुर्वी हा चित्रपट पुढील वर्षात म्हणजे 2023 मध्ये फ्लोअरवर जाईल असे सांगण्यात आले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.