Sooraj Pancholi Dainik Gomantak
मनोरंजन

Sooraj Pancholi : जिया खान आत्महत्या प्रकरणातून सुटल्यानंतर सूरज पांचोली आता या प्रोजेक्टमधून दिसणार...

अभिनेता सूरज पांचोलीने आता जिया खान प्रकरणातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर एका प्रोजेक्टमधून कमबॅक केलं आहे.

Rahul sadolikar

Sooraj Pancholi Comeback in Industry from Music Video : जिया खान आत्महत्या प्रकरण बॉलीवूडमधल्या सगळ्या चर्चित आणि गाजलेल्या प्रकरणांमधले एक आहे. अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येला सूरज पांचोली जबाबदार असल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

परंतु काही काळापूर्वी दिलेल्या निर्णयामध्ये न्यायालयाने सूरज पांचोलीने या खटल्यातून निर्दोष मुक्त केलं आहे.आता सूरज पांचोलीने एका नव्या प्रोजेक्टमधून आपल्या कामाची सुरुवात केली आहे.

सूरजचा नवा म्युझिक व्हिडीओ रिलीज

सूरज पांचोलीने त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या म्युझिक व्हिडिओद्वारे इंडस्ट्रीत पुनर्रागमन केले आहे. आपल्या कमबॅकबद्दल बोलताना सूरज म्हणतो की त्याच्या कारकिर्दीला पुन्हा सुरू करण्याच्या या प्रवासात त्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे.

10 वर्षे खटला सुरु होता

2023 साली सूरज पांचोलीला जवळपास 10 वर्षांनंतर जिया खान आत्महत्येप्रकरणी क्लीन चिट देण्यात आल्याने त्याच्या आयुष्यातला एका मोठ्या पर्वाचा अंत झाला आहे. पण इंडस्ट्रीत त्याला पुढे येण्यासाठी आता खूप झगडावे लागेल.

 त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या म्युझिक व्हिडिओसह तो पडद्यावर पुनरागमन करत असताना, त्याच्याबद्दल लोकांच्या धारणा बदलणे आणि त्याच्या कारकीर्दीला नव्याने सुरू करण्यासाठी आणखी काम मिळवणे हे एक आव्हान होते का याबद्दल सूरज बोलला आहे.

सूरज म्हणतो

“माझ्यासाठी ही फक्त सुरुवात आहे आणि अजून बराच पल्ला गाठायचा आहे. माझे आयुष्य एका रात्रीत बदलेल अशी माझी अपेक्षा नाही. ही फक्त सुरुवात आहे आणि अजून बरेच काही करायचे आहे. आणि माझ्याबाबतीत लोकांची धारणा आहे, मी ती बदलू शकत नाही.

तिरस्कार आणि समज

एखाद्याला तुम्ही आवडता किंवा तुम्ही त्याचा तिरस्कार करता, आता एखाद्याचा मी समज कसा बदलू शकतो? याचा विचार करण्याचा मी खरोखर प्रयत्न करत नाही.

माझे हृदय स्वच्छ आहे, आणि माझे मन सकारात्मक आहे. त्यामुळे मला आतापासून फक्त चांगल्या गोष्टी वाटतात,”. सूरज पांचोलीचा हा म्युझिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सूरजचा आशावादी आहेत

पण निकाल आल्यापासून काही बदल झाला आहे का? 2015 मध्ये हिरो या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा पांचोली म्हणतो, “ मला वाटतं, कारण या वर्षाच्या अखेरीस मी एक चित्रपट आणि वेब शो करणार आहे. 

त्यामुळे गोष्टी पूर्वीपेक्षा अधिक उजळ दिसत आहेत. खरं तर, माझ्यात रोज काही बदल होत आहेत. त्यामुळे मला वाटते की लोक आता अधिक स्वागत करत आहेत. आणि एक निर्माता म्हणून, मला स्वतःला असा एखादा अभिनेता हवा आहे ज्यामध्ये असे बॅगेज नाही. मला वाटते की गोष्टी अधिक चांगल्या होतील. ”

Viral Video: मंचावरुन माइक फेकला अन् राडा घातला! काँग्रेस आमदाराचा हाय-व्होल्टेज ड्रामा; CM ला दिलं थेट चॅलेंज

Hafiz Saeed And Masood Azhar: हाफिज सईदला लाहोरमधून रावळपिंडीला, तर मसूद अजहरला सिंधमध्ये केलं शिफ्ट; पाकड्यांना 'ऑपरेशन सिंदूर'ची धास्ती

T20 Cricket: गोव्याच्या फलंदाजांचा सूर हरपला; विदर्भाची 7 विकेट्सनी सहज बाजी

Indian Football League: धेंपो क्लबसमोर गोल करण्याचे आव्हान; विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी चानमारी एफसीशी लढत

Mental Wellbeing: गोंगाटाच्या जगात मनाला हवे एक अदृश्य अंगण; स्वतःसाठी जपलेला शांततेचा कोपरा

SCROLL FOR NEXT