Indian Football League: धेंपो क्लबसमोर गोल करण्याचे आव्हान; विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी चानमारी एफसीशी लढत

Dempo FC vs Chanmari FC Match: फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर रविवारी (ता. १५) धेंपो क्लब ऐजॉल येथील चानमारी एफसीविरुद्ध खेळणार आहे.
Dempo FC vs Chanmari FC Match
Indian Football LeagueDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: धेंपो स्पोर्टस क्लबने इंडियन फुटबॉल लीग (आयएफएल) स्पर्धेतील दोन्ही सामने जिंकले आहेत, मात्र या सफल कामगिरीत चांगल्या संधी मिळूनही गोल करण्याबाबत संघाला दबदबा राखता आला नसल्याची चिंता मुख्य प्रशिक्षक समीर नाईक यांना सतावत आहे.

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर रविवारी (ता. १५) धेंपो क्लब ऐजॉल येथील चानमारी एफसीविरुद्ध खेळणार आहे. सुरवातीच्या दोन्ही सामन्यांत गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण करूनही त्यांचा पुरेपूर फायदा घेण्यात संघाला अपयश आले, याकडे प्रशिक्षक समीर नाईक यांनी शनिवारी सामनापूर्व पत्रकार परिषदेत लक्ष वेधले.

Dempo FC vs Chanmari FC Match
Political Betrayal in Goa: 500 वर्षांनंतरही विश्वासघाताची सावली; गोव्याच्या राजकारणाला आत्मपरीक्षणाची गरज

गोल करण्याच्या बाबतीत अधिक अचूकता आणि प्रभावीपणा दाखविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. चानमारी संघाला कमी लेखणार नसल्याचे सांगत प्रतिस्पर्ध्याच्या बलस्थानांचा अभ्यास करून रणनीती आखल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. धेंपोचा बचावपटू साईश बागकर यानेही मागील लढतीतील विजयामुळे संघाचा आत्मविश्वास वाढल्याचे सांगितले.

दृष्टिक्षेपात...

धेंपो क्लब : २ सामने, २ विजय, ३ गोल केले, १ गोल स्वीकारला, ६ गुण

धेंपो क्लबचे विजय : विरुद्ध बंगळूर युनायटेड १-०, विरुद्ध समलेश्वरी स्पोर्टिंग २-१

चानमारी एफसी : १ सामना, १ बरोबरी, १ गोल केला, १ गोल स्वीकारला, १ गुण

चानमारी एफसी मागील लढतीत : बरोबरी विरुद्ध शिलाँग लाजाँग एफसी १-१

Dempo FC vs Chanmari FC Match
Goa Politics: शिवराळ भाषा, सालस थापा आणि राजकीय सभ्यता; गोव्याच्या राजकारणाचा नवा चेहरा!

गतमोसमात एकमेकांविरुद्ध

२ सामने, चानमारी एफसी विजयी १, बरोबरी १

१२ मार्च २०२६ रोजी २-२ गोलबरोबरी

९ मे २०२६ रोजी चानमारी एफसी २-० फरकाने विजयी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.