

Raj Kundra Standup Comedy ॲडल्ट फिल्म्समुळे तुरुंगपास पत्करावा लागलेला अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा आता लोकांना हसवण्यासाठी समोर आला आहे. स्टँडअप कॉमेडी करत राज कुंद्राने आपल्या आयुष्यातला संघर्षही सांगितला आहे. चला पाहुया राज कुंद्रा नेमकं काय म्हणाला.
शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा त्याच्या नव्या अवतारात स्टँडअप कॉमेडियनच्या रुपात लोकांसमोर आला आहे.
स्टँडअप कॉमेडीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर दिसत आहे ज्यामध्ये तो बोलत असताना राज कुंद्राने स्वतःची खिल्ली उडवत आहे.
कॉमेडी करताना राज कुंद्राने त्याच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचे स्पष्टीकरणही अतिशय हुशारीने देताना दिसत आहे.
ॲडल्ट फिल्म्स बनवून हॉटशॉट्स ॲपवर विकण्याच्या रॅकेटमध्ये सामील असलेल्या राजला 2021 साली तुरुंगातही जावं लागलं होतं. या आरोपासाठी त्याला 63 दिवस तुरुंगातही काढावे लागले.
तुरुंगातून बाहेर आल्यापासून राज नेहमी मास्कमध्ये दिसत आहे. या शोमध्येही तो मास्कमध्ये दिसत आहे.
शो सुरू करण्यापूर्वीच राज कुंद्रा म्हणाला, जर कोणाला लैंगिक विनोदांवर आक्षेप असेल तर 10 मिनिटे बाहेर जा. जेव्हा कोणीही उठत नाही, तेव्हा तो म्हणतो - हा एक मोठा प्रेक्षक आहे, यार. यानंतर त्याने स्वतःची ओळख करुन देताना राज कुंद्रा म्हणाला, 'महिला आणि सज्जन, राज कुंद्रा, लोक मला मास्क मॅन म्हणूनही ओळखतात. मला शिल्पाचा नवरा म्हणूनही ओळखले जाते. या सगळ्याशिवाय लोक मला चीप कान्ये वेस्ट म्हणतात.
राज कुंद्राने कॉमेडी करताना आपल्या भूतकाळाविषयीही सांगितले, 'वयाच्या 18 व्या वर्षी मी लंडनमध्ये टॅक्सी चालवत असे. वयाच्या 21 व्या वर्षी मी पश्मीना शालीचे साम्राज्य निर्माण केले होते. त्यामुळे माझे काम नेहमी कपडे घालणे होते, ते काढणे नाही.
काही दिवसांपासून अशी चर्चा होती की राज लवकरच त्याच्या बायोपिकमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. नुकतीच अशीही बातमी आली होती की, तो स्वतः या चित्रपटात काम करणार नाही.
दरम्यान, राजचा हा स्टँडअप कॉमेडी व्हिडिओ लोकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. या व्हिडिओमध्ये राज त्याचा मित्र मुन्नावर फारूकीसाठी कॉमेडी करताना दिसत असल्याचे सांगितले जात आहे.