Sonu sood Dainik Gomantak
मनोरंजन

Video: उन्हाच्या तडाख्यात प्या सोनू सूदने बनवलेला ऊसाचा रस

सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सोनू सुद ऊसाचा रस तयार करताना दिसत आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) लॉकडाऊन दरम्यान अनेक गरजूंची मदत केली. तो सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. नुकताच सोनू शिर्डीला गेला. शिर्डीला असताना सोनूनं साईकृष्ण या दुकानाला भेट दिली. या दुकानामध्ये चहा, उसाचा रस आणि इतर काही वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. सोनूने सोशल मिडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो एका दुकानाची माहिती देताना दिसत आहे. दुकानाची माहिती देता असताना तो आलेल्या ग्राहकांना ऊसाचा रस स्वत: बनवून देताना दिसत आहे. (Sonu Sood latest news )

व्हिडीओमध्ये सोनू म्हणतो, 'हे आहे साईकृष्णा दुकान, हे एखाद्या शोरूमसारखं आहे. इथे चहा पण मिळतो.' पुढे सोनू आलेल्या ग्राहकांना 'तुम्हाला काय पाहिजे?', असा विचारतो. त्यानंतर ते ग्राहक सोनूला ऊसाचा रस मागतात. नंतर सोनू स्वत:च्या हातानं ऊसाच्या रसाची मशीन सुरू करतो आणि रस तयार करायला सुरूवात करतो. या व्हिडीओला (Video) कमेंट करून अनेक नेटकऱ्यांचं कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'माय रिअल हीरो, सर मला तुमचा अभिमान वाटतो.'

सोनु सुदचे 'फतेह' आणि 'पृथ्वीराज' हे आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शहीद' या चित्रपटामधून (Movie) सोनूनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. चित्रपटांबरोबरच तो जाहिरातींमध्ये देखील काम करतो. सोनू सुदने आत्तापर्यंत 70 चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubhanshu Shukla: अंतराळवीर 'शुभांशू शुक्ला' पृथ्वीवर परतणार! हार्मनी मोड्यूलमधून प्रवास होणार सुरु

Ram Temple Film: राम मंदिरावर गोव्यातील कॅथलिक मंत्री बनवणार चित्रपट; 'अयोध्या - द फायनल आर्ग्युमेंट'मधून उलघडणार इतिहास

Valpoi: देवाक काळजी रे! गवाणे-सत्तरीतील कुटुंबाला मिळणार निवारा; आरोग्यमंत्री राणे बांधून देणार घर

Goa News Live Updates: बालरथ केवळ ३ कि.मीतील विद्यार्थ्यांसाठी

Goa Smuggling: 2 लाखांच्या खैरीच्या लाकडांची तस्करी रोखली! वन अधिकाऱ्यांची कारवाई; धारबांदोड्यात तिघांना घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT