Sonu Nigam Dainik Gomantak
मनोरंजन

Sonu Nigam: सोनू निगमसोबत धक्काबुक्की, ठाकरे गटातील आमदाराच्या मुलाविरोधात तक्रार

ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर यांच्या मुलाने गायक सोनू निगम याच्यासोबत धक्काबुक्की केल्याचे बोलले जात आहे.

Pramod Yadav

प्रसिद्ध गायक सोनू निगम याला चेंबूरमधील एका कार्यक्रमात धक्काबुक्की झाल्याचं समोर आले आहे. या घटनेनंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी या हाणामारीत सोनू निगमचा क्रू मेंबर जखमी झाल्याची बातमी आहे.

दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर यांच्या मुलाने गायक सोनू निगम याच्यासोबत धक्काबुक्की केल्याचे बोलले जात आहे.

सोमवारी चेंबूर फेस्टिव्हलचा शेवटचा दिवस होता, ज्यात सोनू निगम परफॉर्म करणार होता. कार्यक्रमात परफॉर्म करून तो स्टेजवरून परतत असताना सेल्फी घेण्यासाठी अनेक लोक जमले.

यात धक्काबुक्की झाली आणि सोनू निगमच्या टीममधील एक व्यक्ती खाली पडला, त्यामुळे तो जखमी झाला, असे सांगण्यात येत आहे. या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आले आणि नंतर एक्स-रे करून घरी पाठवण्यात आले.

ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर यांच्या माध्यमातून चेंबूर फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. आमदाराचा मुलगा स्वप्निल फातर्फेकर याने सोनू निगम सोबत धक्काबुक्की केल्याची माहिती समोर येतेय.

नेमके घडले काय?

चेंबूर फेस्टिवलमध्ये सोनू निगमचा लाईव्ह कार्यक्रम होता, कार्यक्रमानंतर सोनू निगम स्टेजवरून खाली उतरताना, सेल्फीसाठी लोकांनी धावपळ केली. आमदाराचा मुलगा स्वप्निल फातर्फेकर याने सोनू निगम सोबत धक्काबुक्की केल्याचे दिसत आहे.

यात सोनू निगम स्टेजच्या पायरीवरून खाली पडला, त्याला वाचवायला गेलेल्या सोनू निगमच्या अंगरक्षकांमधील एकजण खाली पडला. यात सोनू निगम सुदैवाने वाचले असून त्यांच्यासोबत टीममध्ये असलेला एक व्यक्ती जखमी झाला आहे.

दरम्यान, मध्यरात्री सोनू निगमने चेंबूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सोनू निगमच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आयपीसी कलम 341, 323, 337 च्या अंतर्गत आमदार प्रकाश फातेरपेकर यांचा मुलगा स्वप्निल फातर्फेकर विरोधात गुन्हा दाखल केला आहेत. प्रकरणाचा अधिक तपास चेंबूर पोलीस करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: विद्यार्थ्यांनी भ्रष्टाचाराविरोधात आवाज बुलंद करावा, कॅश फॉर जॉब प्रकरणी आमदार व्हेंझी यांचं आवाहान

Goa Diabetes Epidemic: धक्कादायक! राज्यात दर चौघांमागे एकाला मधुमेह; 26.4 टक्क्यांहून अधिक गोमंतकीयांना आजाराची लागण

Cash For Job Scam: कॅश फॉर जॉब प्रकरणी 'दीपाश्री'ला कोर्टाचा झटका; सुनावली दोन दिवसांची पोलिस कोठडी

Goa Crime: एकाच दिवशी 2 रशियन नागरिकांचा गोव्यात मृत्यू, कारण अद्याप अस्पष्ट; पोलिसांकडून तपास सुरु

Goa Agriculture: गोव्यात मिरी लागवड क्षेत्रात वाढ! 350 टन उत्पादन; 868 हेक्टर क्षेत्रफळात लागवड

SCROLL FOR NEXT