Bollywood Famous actress Sonakshi Sinha Instagram/Sonakshi Sinha
मनोरंजन

Sonakshi Sinha: 'अभिनय नाही तर सोनाक्षी हाऊसवाइफ चागंली होऊ शकते,' असं का म्हणाली करिना?

Sonakshi Sinha: शाहीद कपूरच्या या उत्तराने करण जौहरदेखील हैराण दिसून आला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Sonakshi Sinha: बॉलीवूडमध्ये असे काही सितारे आहेत जे फक्त आपल्या उत्तम अभिनय, हिट चित्रपट आणि अप्रतिम सौंदर्यासाठी ओळखेले जात नाहीत तर आपल्या वक्तव्यासाठीदेखील चर्चेत असतात. आता करीना कपूरचा एक जूना व्हिडिओ सोशल मिडियावर पून्हा व्हायरल होताना दिसत आहे.

कॉफी विथ करण या टॉक शो मध्ये जेव्हा करिना कपूरने हजेरी लावली होती. त्यावेळी करण जौहरने करिना कपूरला ती सोनाक्षी सिन्हाला अभिनय क्षेत्रात बघत नाही तर कोणते करिअरचे क्षेत्र तिच्यासाठी योग्य असेल अथवा सोनाक्षीचे अल्टरनेट करिअर कोणते असेल असा प्रश्न विचारला असता करिनाने सोनाक्षीला हाऊस वाइफच्या रुपात पाहत असल्याचे म्हटले होते.

त्यानंतर याच कॉफी विथ करण शोमध्ये शाहिद कपूर आणि सोनाक्षी सिन्हा जेव्हा कॉफी विथ करण शोमध्ये गेल्यानंतर करणने हा मुद्दा उपस्थित केला होता. तेव्हा सोनाक्षी ऐवजी शाहीद कपूरने या प्रश्नाला उत्तर दिले आहे. सोनाक्षी हाऊसवाइफचे काम करण्याशिवाय बाकी इतर बरेच काही करु शकते. त्यावेळी सोनाक्षीने शाहीदच्या उत्तरात हामी भरली होती. शाहीद कपूरच्या या उत्तराने करण जौहरदेखील हैराण दिसून आला होता.

दरम्यान, करीना कपूर आणि शाहीद कपूर यांचे नाते मोठ्या चर्चेत होते. 'जब वी मेट' या त्यांच्या प्रसिद्ध चित्रपटानंतर त्यांचे ब्रेकअप झाल्याचे म्हटले जाते. त्याचबरोबर 'आर राजकुमार' या सोनाक्षी सिन्हा आणि शाहीद कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान या दोघांच्या नात्याची देखील चर्चा रंगली होती. मात्र दोघांकडूनही अधिकृतरित्या यावर कोणतेही भाष्य करण्यात आले नव्हते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT