Sohail Khan Birthday Dainik Gomantak
मनोरंजन

Sohail Khan Birthday: अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक सोहेल खान! जाणून घ्या प्रवास

Sohail Khan: अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक सोहेल खानचा आज वाढदिवस आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिबूड अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक असणाऱ्या सोहेल खानचा आज वाढदिवस आहे. 20 डिसेंबर 1970 रोजी महाराष्ट्रात सोहेलचा जन्म झाला. सोहेल हा बॉलिवूडचे लोकप्रिय पटकथा लेखक सलीम खान यांचा मुलगा आहे. तसेच तो सलमान खानचादेखील भाऊ आहे.

सोहेलने 1997 साली 'औजार' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण केले. या चित्रपटात संजय कपूर (Sanjay Kapoor), सलमान खान (Salman Khan) आणि शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर त्याने 1998 साली 'प्यार किया तो डरना क्या' या सुपरहिट सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली. तसेच तो या चित्रपटामध्ये निर्माता देखील होता. या चित्रपटात सलमान खान, अरबाज खान (Arbaaz Khan), काजोल (Kajol) आणि धर्मेंद्र (Dharmendra) मुख्य भूमिकेत होते.

  • सोहेलच्या अभिनय प्रवासाला सुरुवात कशी झाली

चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून यशस्वी झाल्यानंतर सोहेलने 2002 साली 'मैंने दिल तुझको दिया' या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता म्हणून पदार्पण केले. या चित्रपटात अभिनय करण्यासोबत सोहेलने चित्रपटाचे दिग्दर्शन, निर्मिती आणि पटकथालेखक म्हणून देखील काम केले आहे. पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट आपली जादू दाखवण्यात कमी पडला.

डरना मना हैं, कृष्णा कॉटेज, आर्यन, हीरोज, गॉड तुस्सी ग्रेट हो, लवयात्री अशा अनेक चित्रपटांमध्ये सोहेलने उत्तम काम केले आहे. हेलो ब्रदर, पार्टनर, गॉड तुस्सी ग्रेट हो आणि रेडी सारख्या काही चित्रपटांची त्याने निर्मिती केली आहे. तसेच यातील हॅलो ब्रदर, मैंने दिल तुझको दिया आणि जय हो सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन सोहेलने केले आहे. चित्रपटांसह सोहेलने छोट्या पडद्यावरील 'कॉमेडी सर्कस का नया दौर' या लोकप्रिय कार्यक्रमाचं परीक्षणदेखील केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"...म्हणून गोवा बर्बाद" राज ठाकरेंनी मांडलं जमिनींच्या लुटीचं 'डिजिटल' गणित; महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत रील्सस्टार्सना लगावला टोला

Goa Tourism: गोव्याचा पर्यटनात जागतिक डंका! 2025 मध्ये 1 कोटी 8 लाख पर्यटकांनी दिली भेट

IND vs NZ: ऋषभ पंतच्या जागी 'या' युवा खेळाडूची संघात एन्ट्री, 'BCCI'ने केली घोषणा

Goa Politics: गोव्यात 'आप'ची नवी टीम जाहीर! वाल्मिकी नाईक प्रदेशाध्यक्ष, तर गर्सन गोम्स कार्यकारी अध्यक्ष

History: कर्नाटक, महाराष्ट्र ते आंध्र: सहा शतके दख्खनवर अधिराज्य गाजवणाऱ्या 'चालुक्य' घराण्याची शौर्यगाथा

SCROLL FOR NEXT