Siddharth Dinik Gomantak
मनोरंजन

म्हणून तू आवडलास ! सिद्धार्थच्या ट्विटला सायनाचे उत्तर

सिद्धार्थने (Siddharth) आपल्या शब्दांना योग्य ठरवत त्यात डबल मीनिंग नसल्याचं सांगितलं

दैनिक गोमन्तक

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर असतांना त्यांचा ताफा अडवण्यात आला. यावेळी सायना नेहवालने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटींबद्दल चिंता व्यक्त केली होती आणि याबद्दल तिने ट्विट केले होते. सायना नेहवालने केलेल्या ट्विटला अभिनेता सिद्धार्थने ट्विटवरच प्रतिक्रिया दिली. यावेळी सायना नेहवालने म्हटले की, त्यात आणखी चांगले शब्द वापरता आले असते. परंतू याला प्रत्युत्तर म्हणून सिद्धार्थने (siddharth) एक ट्विट केले, त्यात काही आक्षेपार्ह होते. त्यावरून वादही झाला आणि अनेकांनी सिद्धार्थला ट्विट काढून माफी मागण्यास सांगितले. परंतू त्याऐवजी सिद्धार्थने आपले म्हणणे ट्विटच्या माध्यमातून स्पष्ट केले आणि ते बरोबर असल्याचे सांगितले.

सायना नेहवालने (Saina Nehwal)म्हटले की, 'मला माहीत नाही की त्याचा काय अर्थ होता. मला खरं तर तो अभिनेता म्हणून आवडला होता, पण ते खरे नव्हते. तो स्वताचे मत अधिक चांगल्या शब्दांत मांडू शकला असता पण तसे झाले नाही. सायना नेहवालने म्हटले की, हे ट्विटर (twitter)आहे आणि तुम्ही अशा शब्दांतून आणि गोष्टींद्वारे लक्षात राहता. जर भारताच्या पंतप्रधानांच्या (Prime Minister) सुरक्षेचा प्रश्न असेल, तर हे मला माहीत नाही की या देशात सुरक्षित काय आहे...?

ट्वीटर अकाउंट ब्लॉक करण्याची मागणी

सायनाच्या ट्विटरवर सिद्धार्थ ने केलेल्या कमेंटवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. महिला आयोगाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. महिला आयोगा (women commission)च्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी 'ट्विटर इंडिया' (twitter india) च्या स्थानिक तक्रार अधिकाऱ्याला पत्र लिहून सिद्धार्थचे ट्विटर अकाऊंट त्वरित ब्लॉक करावे, अशी विनंती केली आहे. तत्पूर्वी, सायना नेहवालने पंजाबमधील पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील त्रुटींवर ट्विट केले होते आणि म्हटले होते की,

याला उत्तर देताना सिद्धार्थने ट्विट केले आहे. त्यात तो म्हणाला की, 'वरच्याची कृपा की आमच्याकडे भारताचे रक्षक आहेत याबद्दल धन्यवाद.' या गदारोळानंतर ग सिद्धार्थने आपल्या शब्दांना योग्य ठरवत त्यात डबल मीनिंग नसल्याचं सांगितलं. सिद्धार्थ म्हणाला,

कोण आहे सिद्धार्थ

सिद्धार्थ हा प्रसिद्ध अभिनेता असून तो तामिळ चित्रपटसृष्टीत सुध्दा अधिक सक्रिय आहे. तसेच त्याने हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी अप्रतिम चित्रपट केले आहेत. रंग दे बसंती, स्ट्रायकर, द हाऊस नेक्स्ट डोअर या नावांचा समावेश आहे. सिद्धार्थने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र सिद्धार्थ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या (bjp) कार्यशैलीचे जोरदार विरोधक आहेत. अनेकवेळा त्यांनी सरकारला प्रश्नात घेरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT