Petrol तर कोणीही स्वस्त करेल, मात्र 'असे' व्हिडीओ कोण देईल; ट्विट होतेय व्हायरल

ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, पेट्रोल डिझेलच्या (Petrol-Diesel) किंमती कितीही वाढो मात्र सरकारने आतंकवाद्यांना मारत राहीले पाहिजे.
Fuel Pump Representative Image
Fuel Pump Representative ImageDainik Gomantak
Published on
Updated on

पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) वाढत्या किंमतींच्या मुद्दयावरुन विरोधक केंद्र सरकारला (Central Government) धारेवर धरत असल्याचे पहायला मिळते आहे. तर दुसरीकडे काही लोकांसाठी 'किती आतंकवादी मारले जाताय' हे जास्त महत्वाचे आहे. याच मुद्दयावरचे काही ट्विट सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होताना दिसता आहेत. ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, पेट्रोल डिझेलच्या किंमती कितीही वाढो मात्र सरकारने आतंकवाद्यांना मारत राहीले पाहिजे. (Anyone will make Petrol cheaper, but who will give such a video; The tweet goes viral)

याच विषयावर श्रीश त्रिपाठी यांनी लिहिले की, ‘पेट्रोलला सबसिडी देऊन 10 रुपये लिटर स्वस्त कोणीही करेल, पण अतिरेक्यांना मारण्याचा असा व्हिडिओ कोण देईल?'. यासह त्यांनी त्याच ट्विटमध्ये लिहिले की, 'हा नवीन भारत आहे! दहशतवाद्यांची कुठलीही दया न करण्याचे धोरण स्विकारत ज्या घरात दहशतवादी लपून बसले आहेत, त्या घराला सैन्याने मॅन पोर्टेबल अँटी टँक गाईडेड मिसाईलने उडवून दिले!

ट्वीटसह त्यांनी एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. ज्यामध्ये एक घर जळताना दिसते आहे. त्याचबरोबर त्या घरावर जोरदार गोळीबारही केला जात आहे. मात्र हा व्हिडिओ कधीचा आहे आणि कुठला आहे हे या व्हिडीओमधुन समजु शकले आहे.

या ट्विटवरील व्हिडीओ सुमारे दोन तासांत, 1600 हून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर सुमारे तीनशे लोकांनी हे ट्विट रिट्वीट केले आहे. तसेच, अनेक लोकांनी हे ट्विट लाईक केल्याचे सुद्धा पहायला मिळते आहे.

Fuel Pump Representative Image
Yogi Government: रोहिंग्या कॅम्पवर JCB चालवत सरकारी जमीन केली खाली

एका युजरने लिहिले, 'हा व्हिडीओ पाहुन मजा आली, आज एका मताची ताकद दिसून आली.' त्याचबरोबर इतर अनेक जणांनी सुद्धा मोदी सरकारचे कौतुक केल्याचे दिसले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com