Suraj Kumar-Shahrukh-Khan Dainik Gomantak
मनोरंजन

Suraj Kumar: '... तर मी शाहरुख खानसमोर रडायला सुरु करेन'- असं का म्हणाला शाहरुखचा हमशकल

Suraj Kumar: त्यानंतर दररोज मन्नत समोर जाणे हा माझा दिनक्रम झाला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Suraj Kumar: बॉलीवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान नेहमीच आपल्या चाहत्यांचे एकापेश्रा एक चित्रपटातून मनोरंजन करत असतो. कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे तो चर्चेतदेखील असतो. आता मात्र चर्चा शाहरुखच्या हमशकलची रंगली आहे .

गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खानचा हमशकल सूरज कुमार मोठ्य चर्चेत आहे. तो हुबेहुब शाहरुखसारखा दिसत असून सध्या इंटरनेट सेंसेशन बनला आहे. सूरजने एका मुलाखतीतून शाहरुखसारखे दिसण्यामुळे त्याला काय अनुभव येतात, त्याला शाहरुखबद्दल काय आवडते , शाहरुख खानचे कोणते चित्रपट त्याला आवडतात याबद्दल दिलखुलाास गप्पा मारल्या आहेत.

सूरज म्हणतो, मला शाहरुखचे 90 च्या दशकातले चित्रपट खूप आवडतात. ज्यामध्ये बाजीगर, दीवाणा, एस बॉस, चमत्कार, राजू बन गया जेंटलमॅन आणि माया मेमसाब अशा चित्रपटांचा समावेश आहे.

90च्या दशकातली शाहरुखची स्टाइल अफलातून होती. त्यांची बोलण्याची पद्धत, केसांची स्टाइल आणि त्यांचा डान्स सगळेच वेगळ्या प्रकारचे होते, जे त्यांच्या आत्ताच्या चित्रपटात दिसून येत नाही. त्यामुळेच माझी मिमिक्रीदेखील त्यांच्या 90 च्या दशकातील चित्रपटांच्या आजूबाजूला फिरताना दिसून येईल.

आधी लोक माझ्यावर हसायचे

सूरज म्हणतो की, सुरुवातीच्या काळात जेव्हा मी सार्वजनिक ठिकाणी शाहरुखसारखी अॅक्टिंग करायचो तेव्हा लोक मला हसायचे. त्यानंतर सोशल मिडियावर माझे काही व्हिडिओ व्हायरल झाले तेव्हा लोकांना माझे काम समजले.

आता लोक जवळ येतात, कामाचे कौतुक करतात, म्हणतात-तुम्ही 90 च्या दशकातले शाहरुख खान दिसता. लोक आता माझ्याबरोबर सेल्फीसुद्धा घेतात. मलादेखील अभिनेता बनायचे असल्याने अनेकांनी मला किंग खान सारखे मसल्स बनवण्याचा सल्ला दिला आहे.

...तर मी शाहरुख खानसमोर रडायला सुरु करेन

झारखंडमध्ये राहणाऱ्या सूरजने अॅक्टर बनण्यासाठी आणि शाहरुखला भेटण्यासाठी सहा वर्षापूर्वी आपले घर सोडले होते. सूरज सांगतो- वडीलांच्या खिशातून काही पैसे चोरुन घेऊन मी घर सोडून मुंबईत आलो. त्यानंतर दररोज मन्नत समोर जाणे हा माझा दिनक्रम झाला होता. मात्र आजपर्यत माझी शाहरुख खान बरोबर भेट झाली नाही.

'जेव्हा शाहरुख माझ्या समोर यईल तेव्हा मी रडायला सुरुवात करेन' असेही सूरज पुढे बोलताना म्हणतो. मिळालेल्या माहीतीनुसार, काही दिवसांपूर्वीच पुलकित सम्राट बरोबर सूरजला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे.त्यामुळे सूरजचे अॅक्टर बनण्याचे स्वप्न तर पूर्ण झाले आहे.

आता शाहरुखबरोबर त्याची भेट कधी होईल याची आतुरतेने प्रतिक्षा करत आहे. याबरोबरच शाहरुखसारखी आपल्या अभिनयाची जादू सूरज दाखवू शकेल का हे पाहणे महत्वाचे ठऱणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; रवींच्‍या व्‍हिजनवर गोविंदांची वाटचाल

Goa Education: 'यापुढे कठीण प्रश्‍‍नपत्रिका न देण्‍यावर भर देऊ'! तिसरीच्या प्रश्नपत्रिकेवरून गोंधळ, SCERT संचालकांचे प्रतिपादन

Who After Ravi Naik: फोंड्यातील पोटनिवडणुकीवरून भाजपसमोर पेच! रवी नाईक यांचे कनिष्‍ठ सुपुत्र 'रॉय' यांच्या नावाचाही आग्रह

Ranji Trophy 2025: हुर्रे! गोव्याची दणदणीत विजयी ‘दिवाळी’, चंडीगडला नमवले; पाहुणा 'ललित' सामन्याचा मानकरी

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

SCROLL FOR NEXT