Sonu Sood: 'मी चप्पल दुरुस्त करतो अन् सोनू सूद ...'

Sonu Sood: या फोटोमधील पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
Sonu Sood
Sonu SoodDainik Gomantak

Sonu Sood: बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद पून्हा एकदा चर्चेत आला आहे. सोनू सूदने कोरोणाच्या काळात केलेल्या मदतकार्याचा प्रभाव अनेकवेळा आजही दिसून येतो. सोनू सूदने अनेक गरजूंना मदत केली होती. त्यामुळे एक अभिनेता म्हणून असलेल्या त्याच्या चाहत्यांमध्ये त्याच्या या कामांमुळे अनेक पटीने वाढ झाल्याचे दिसून येते.

अनेक वेळा सोशल मिडियाच्या माध्यमातून लोक सोनू सूदचे आभार मानत असतात. कधी कौतुक करतात तर कधी आपल्याला अडचणीच्यावेळी सोनू सूदने कशाप्रकारे मदत केली याच्या आठवणी सांगतात.

आता सोनू सूदने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये एक व्यक्ती चप्पल दुरुस्त करताना दिसत आहे. मात्र या फोटोमधील पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

या पोस्टरवर लिहले आहे की, " मैं जूता बनाता हॅूं और सोनू सूद देश ." हा फोटो शेअर करत सोनू सूदने हे कुठे आहे, याबद्दल मला कोणी सांगू शकेल का ? असा प्रश्न विचारत मला हे खूप आवडले असे सोनू सूदने म्हटले आहे.

सोशल मिडियावर या फोटोची चांगलीच चर्चा रंगली असून पोस्ट केल्यानंतर 1लाखाहून अधिक लोकांनी लाइक केले आहे.

कोरोणाच्या काळात अनेक जनसामान्य संकटात असताना सोनू सूदने उचलले पाऊल महत्वपूर्ण होते. त्याच्या मदतीने अनेकांना जगण्याचा नवीन मार्ग मिळू शकल्याच्या भावना सोशल मिडियावर व्यक्त केल्या जातात.

Sonu Sood
Sidhu Moose Wala: सिद्धू मुसेवालाच्या वाढदिवशी आईची भावूक पोस्ट

इतकेच काय तर त्याने मजूरांना केलेल्या मदतीने भारावून गेलेल्या तेलंगनातील सिद्दीपेट येथिल दुब्बा तांडा गावातल्या लोकांनी त्याचे मंदीर बांधले आहे. याबरोबरच सोनू सूदच्या सामाजिक कार्याबद्दल त्याला पद्मश्री मिळावा याची मोठी चर्चा सुरु होती. त्याला पुरस्कार मिळाला नसला तरीही त्याचे सामाजिक कार्य अविरतपणे सुरु असल्याचे वेगवेगळ्या माध्यमातून दिसून येते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com