Smita Patil Dainik Gomantak
मनोरंजन

Smita Patil : स्मिता पाटील...सावळा रंग आणि बोलक्या डोळ्यांचं आरस्पानी सौंदर्य...

अभिनेत्री स्मिता पाटील हे 70 च्या दशकातलं असं नाव होतं ज्यात अभिनयाच्या परिभाषेचा खरा अर्थ उमगतो.

Rahul sadolikar

अभिनेत्री स्मिता पाटील... आज आपल्यात नाही ;पण तिचा अभिनय आणि बोलक्या डोळ्यांचं सावळं सौंदर्य आजही सगळ्या वयोगटातल्या प्रेक्षकांच्या आठवणीत कस्तुरी मृगाच्या सुगंधासारखं ताजं आहे.

आजही स्मिता आठवते. स्मिता उंबरठ्यामधली ध्येयवादी अन् निश्चयी. मिर्च मसालामधली नवऱ्याच्या प्रेमाला आसुसलेली, मंथन मधली तथाकथित खालच्या जातीची आणि आज रपट जाये असं म्हणत मेनस्ट्रीमच्या अमिताभसोबत रोमान्स करणारी सगळ्या भूमीकात स्मिताने अभिनयाचं सौंदर्य कोजागिरीच्या चांदण्यासारखं पसरवलं आणि प्रेक्षकांना मनसोक्त न्हाऊ घातलं. आजपासुन आम्ही सुरू करतोय बॉलिवूड डायरीचं ते पान जे समांतर चित्रपट म्हणून ओळखलं जातं त्याच पानावरची देखणी अभिनेत्री आज तुमच्यासमोर पुन्हा प्रकट करतोय काळाच्या मर्यादेला भेदत. चला पाहुया बॉलिवूड डायरीतलं हे अनोखं व्यक्तिमत्व

70 च्या दशकातला समांतर सिनेमा अन् स्मिता पाटील

आपल्या निखळ सौंदर्य आणि नैसर्गिक अभिनयाने चित्रपटरसिकांच्या मनावर ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री स्मिता पाटील आजही त्यांच्या चित्रपटाच्या रुपाने जिवंत आहेत. अवघ्या 31 व्या वर्षी जगाचा स्मिता पाटील यांनी जगाचा निरोप घेत या अभिनेत्रीने सगळ्यांनाच हुरहूर लावली.

स्मिताने 70 च्या दशकात जोम धरलेल्या आणि तपन सिन्हा, गोविंद निहलानी , शाम बेनेगल यांसारख्या दिग्गजांनी चालवलेल्या समांतर सिनेमात मोठे योगदान दिले. या चित्रपटात मंथन (1976) , मिर्च मसाला (1987) चक्र (1981) या चित्रपटांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.

Smita Patil

'भूमीका'मधली स्मिताची भूमीका

भूमीका या चित्रपटाचा उल्लेख केल्याशिवाय स्मिताचं करिअर पूर्ण होणार नाही. या चित्रपटातली स्मिता समांतर चित्रपटातल्या स्मितासारखी शोषित किंवा गांजलेल्या वर्गातून येत नाही, ही स्मिता आयुष्यातल्या गोंधळलेल्या आणि संघर्षाच्या परिस्थितीचा सामना करुन आयुष्याला एका अपूर्ण वर्तुळात बघणारी आहे.

बालपणापासुन परिस्थितीला विपरीत स्थितीत पाहणारी स्मिता तरुण वयात एका मोठ्या फेमला अनुभवते पण तरीही ती खुश नाहीये. लावणीसारख्या लोककलेची प्रतिभा जपणारी भूमीका चित्रपटातली स्मिता एकदा जरुर पाहा. उषा दळवीची भूमीका स्मिताने ज्या सहजतेने साकारली आहे ते केवळ काबील-ए - तारीफ अशीच आहे. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह, अमरीश पूरी, अमोल पालेकर या दिग्गजांनी काम केलं आहे.

मंथन मधली तापट बिंदिया

हा चित्रपट तसा भारताच्या धवलक्रांतीचे जनक डॉ. वर्गिस कुरियन यांच्या जीवनावर आधारित आहे. भारताला दुग्धक्रांतीमध्ये अव्वल स्थान मिळवुन देणारे कुरिय़न परिस्थितीशी कसे झगडले याची ही गोष्ट आहे.

या चित्रपटात स्मिताने तथाकथित खालच्या जातीच्या बिंदिया या महिलेचं पात्र साकारलं आहे. यातली स्मिता गुजरातच्या त्या मातीतलीच वाटते जिथली ही गोष्ट आहे. पतीच्या दारुच्या व्यसनाला कंटाळलेली आणि गावात नव्याने आलेल्या डॉक्टरच्या प्रेमात पडणारी स्मिता काय दिसलीय? निव्वळ अप्रतिम.

Smita Patil

'चक्र' चित्रपटातली अम्मा

रवींद्र धर्मराज दिग्दर्शित, 'चक्र' अम्मा (स्मिता पाटील) आणि तिचा मुलगा बेनवा आणि बॉम्बे झोपडपट्टीत जगण्यासाठी त्यांच्या संघर्षाबद्दल आहे. या चित्रपटात मुंबईच्या झोपडपट्टीत जगणारी अम्मा आणि तिचं बदलेलं आयुष्य नव्या व्यवस्थेत त्यांचं आयुष्य कुठेच महत्त्वाचं नाही हे दाखवणारं आहे. या चित्रपटात स्मिताच्या उघड्यावर अंघोळ करण्याच्या सीनने मोठा गोंधळ उडाला होता. या चित्रपटासाठी स्मिताचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे.

Chakra

अर्थ आणि स्मिता

अर्थ (1982) - अभिनेत्री परवीन बाबीसोबत महेश भट्टच्या वास्तविक जीवनावर आधारित 'अर्थ'मध्ये स्मिता पाटील, राज बब्बर आणि शबाना आझमी होते. हा चित्रपटादरम्यान स्मिता पाटील आणि शबाना आझमी यांच्य़ात झालेला वाद नंतर खूप गाजला.

झालेल्या वादानंतर शबाना आझमी यांनी नंतरच्या काळात खंत व्यक्त केली. अर्थ चित्रपटात स्मिताने एका विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडलेल्या आणि मानसिक आजाराने ग्रासलेल्या अभिनेत्रीची भूमिका केली होती.

Smita Patil

स्मिता अचानक गेली.. धक्का होता तिचं जाणं

आपल्या अभिनयाच्या अनोख्या शैलीने स्मिता पाटील नावाच्या जादुने प्रेक्षकांना समांतर जगाच्या गोष्टी दाखवल्या. पण व्यक्तिगत आयुष्यात मात्र स्मिता दुर्दैवी ठरली.

अवघ्या 31 वर्षात या अभिनेत्रीने यशाची वेगळीच उंची गाठली असली तरी स्मिता पाटील यांना आयुष्यात खूप काही करायचे होत. त्यांची खूप स्वप्ने होती. त्यातील काही स्वप्ने साकार झाली. पण काही स्वप्ने अखेर अधुरीच राहिली. आपल्या मुलाला मनभरुन जवळ घेऊ न शकणारी दुर्दैवी आई ठरली स्मिता. बाळाचा जन्म झाला अन् स्मिताने जग सोडलं...चित्रपटांमध्ये आपला प्राण ठेवुन आपले बोलके डोळे मागे ठेवून ती कायमची निघुन गेली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI Opening Ceremony: 55व्या इफ्फीच्या ग्रॅंड ओपनिंग सेरेमनीला दिग्गज लावणार हजेरी; गोव्यात अवतरणार अवघे बॉलिवूड!

Cash For Job Scam: मंत्री गोविंद गावडेंच्या कार्यालयातील माजी कर्मचाऱ्याला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Syed Mushtaq Ali Trophy: सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत 'दीपराज' करणार गोव्याचं नेतृत्व; सुयश उपकर्णधार!

Goa News: लखनौला जाणारे विमान उड्डाणानंतर 20 मिनिटांनी माघारी परतले, गोंधळाची स्थिती; गोव्यातील ठळक घडामोडी!

CM Pramod Sawant: गोमंतकीयांनो सावधान, भुलथापांना बळी पडू नको; वाढत्या फसवणूकीच्या घटनांवर मुख्यमंत्र्यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT