Sonu Nigam & Father Agam Kumar Nigam  Dainik Gomantak
मनोरंजन

Singer Sonu Nigam: सोनू निगमच्या वडिलांच्या घरातून लाखोंची चोरी, या व्यक्तीवर संशय!

Singer Sonu Nigam: बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक सोनू निगम नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो.

Manish Jadhav

Singer Sonu Nigam: बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक सोनू निगम नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आपल्या दमदार गायकीसाठी प्रसिद्ध असलेल्या सोनू निगमबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. सोनूचे वडील आगम कुमार निगम यांच्या घरातून लाखोंची चोरी झाली आहे, त्यानंतर सोनू निगमच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, सोनू निगमचे वडील आगम कुमार निगम यांच्या घरात 72 लाख रुपयांची चोरी झाली आहे, सोनूच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, त्यांना रेहानवर संशय आहे, रेहान आधी त्यांच्या घरी ड्रायव्हर म्हणून काम करायचा. पोलिसांनी (Police) आगम कुमार निगम यांच्या तक्रारीची नोंद करुन याप्रकरणी तपास सुरु केला आहे.

चालक CVTV मध्ये दिसत आहे

मुंबईतील (Mumbai) ओशिवरा पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनाच्या आधारे रेहानविरुद्ध आयपीसी कलम 380, 454 आणि 457 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी रेहानचा शोध सुरु केला आहे.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आगम कुमार आणि निकिता यांनी त्यांच्या सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले, ज्यामध्ये त्यांचा ड्रायव्हर रेहान दोन्ही दिवशी बॅग घेऊन त्याच्या फ्लॅटकडे जाताना दिसला. रेहानने डुप्लिकेट चावीच्या साहाय्याने आपल्या फ्लॅटमध्ये प्रवेश करुन बेडरुममधील डिजिटल लॉकरमधून 72 रुपये चोरल्याचा आगम कुमार यांना संशय आहे.

तसेच, सोनू निगमने गायनासोबतच अभिनयातही हात आजमावला आहे. मात्र, अभिनयविश्वात त्याला फारशी ओळख मिळाली नाही. आजच्या काळात सोनू निगमची गणना बॉलिवूडमधील टॉप गायकांमध्ये केली जाते. सोनू निगम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट राहतो आणि सध्याच्या समस्यांवर आपले मत मांडतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT