Kiara Advani and Sidharth Malhotra Dainik Gomantak
मनोरंजन

Sidharth-Kiara Wedding: कियारा-सिध्दार्थ अडकणार लग्नबंधनात; ‘या’ दिवशी घेणार सात फेरे

Sidharth Malhotra and Kiara Advani Wedding: सिद्धार्थ आणि कियारा नव्या वर्षात आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडमधील चर्चेत असलेली जोडी कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाच्या बातम्यांना चांगलेच उधाण आले आहे. बॉलिवूडमध्येही ही जोडी सतत चर्चेत असते. दोघेही अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. बॉलिवूडच्या स्टायलिस्ट कपल्सपैकी एक म्हणून सिद्धार्थ-कियाराचे नाव घेतले जाते. आता पुन्हा एकदा सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. नव्या वर्षात दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे.

शेरशाह या चित्रपटामध्ये (Movie) सिद्धार्थ आणि कियाराने एकत्र काम केले. या चित्रपटाच्या सेटवरच दोघांची लव्हस्टोरी सुरु झाली. मीडिया रिपोर्ट नुसार सिद्धार्थ आणि कियारा यांनी त्यांच्या लग्नाची पूर्ण तयारी केली आहे. नव्या वर्षात ही जोडी आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. दरम्यान नुकतेच दोघे मनीष मल्होत्राच्या घरीही दिसले होते. त्यानंतर त्यांच्या लग्नाच्या बातम्यांना आणखीनच हवा मिळाली आहे.

पण आतापर्यंत सिद्धार्थ आणि कियाराने लग्नाच्या चर्चांबाबत मौन बाळगले आहे. सध्या हे कपल नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी बाहेर गेले आहे. मीडिया रिपोर्टनुसार सिद्धार्थ आणि कियारा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात लग्नबंधनात अडकणार आहे. या जोडप्याचे प्री-वेडिंग सोहळे 4 आणि 5 फेब्रुवारीला होणार आहे. 6 फेब्रुवारीला ते लग्नबंधनात अडकणार आहेत. मेहेंदी, हळद आणि संगीता या सगळ्या कार्यक्रमांसाठी दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत.

कियारा आणि सिद्धार्थने आपल्या लग्नसोहळ्यासाठी राजस्थानमधील जैसलमेर पॅलेस येथे करणार आहे. सिद्धार्थ आणि कियाराचे लग्न खूप भव्यदिव्य असणार आहे. यासाठी सुरक्षेचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या लग्नात अनेक बॉलिवूड (Bollywood) स्टार्स सहभागी होणार असून, हे लग्न खाजगी ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे बोलले जात आहे. या सोहळ्याच्या सुरक्षेच्या नियोजनासाठी सिक्युरिटी टीम 3 फेब्रुवारीलाच जैसलमेरला पोहोचणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Catch Of The Year! शुभमन गिलची भन्नाट कॅच; हवेत उडी घेतली अन्... Video होतोय व्हायरल...

Goa Government Officers: गोव्यातील जलसंपदा अधिकाऱ्यांचा पुणे आणि शिर्डी दौरा चर्चेत; स्वातंत्र्यदिनाच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह

Konkan Special Trains: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी Good News! गणेशोत्सवात आणखी 16 स्पेशल ट्रेन धावणार, ऑनलाइन बुकिंग सुरू

Crime News: दोन लव्ह अफेयर्स, सात महिन्यांची गर्भधारणा अन् 24 वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू, प्रियकरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; कानपूर हादरलं

Goa Women Drone Pilot Training: गोव्याच्या ‘ड्रोन दीदी’ सज्ज! 12 महिलांनी घेतले ड्रोन पायलटचे प्रशिक्षण; आता दरवर्षी 100 महिलांना ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT