Sarvadaman D Banarjee Dainik Gomantak
मनोरंजन

श्रीकृष्णाची अजरामर भूमीका साकारणारा हा कलाकार शिकवतोय गंगा किनारी योगा...

रामानंद सागर यांच्या जय श्रीकृष्णा मालिकेत भगवान श्रीकृष्णाची भूमीका साकारणारा अभिनेता सर्वदमन डी. बॅनर्जी आज ग्लॅमरपासुन दूर आहेत.

Rahul sadolikar

Sarvdaman D Banerjee immortal role of Shri Krishna, is teaching yoga along the banks of the Ganga : श्रीकृष्ण जन्माष्ठमीचा उत्सव भारतात सर्वत्र मोठ्या जल्लोषात साजरा होतो. दहीहंडी फोडण्याचा उत्सव साजरा करण्यासाठी गोविंदांसह गोपिकांची लगबग सुरू असते.

श्रीकृष्णाच्या बाललीलांची आठवण करुन देणारे नटलेले बालक शाळांमधुन दिसतात.हिंदू धर्मात भगवान श्रीकृष्णाला भगवंत म्हटलं गेलंय.

कुरुक्षेत्रावर अर्जुनाला धर्माचा उपदेश देणारे भगवान श्रीकृष्ण मनोरंजन क्षेत्राला आजही खुणावतात म्हणूनही या विलक्षण व्यक्तिरेखेवर आजवर अनेक कलाकृती बनल्या.

आज आपण पाहुय अशा एका कलाकाराने ज्याची ओळखच श्रीकृष्णाच्या भूमीकेमुळे झाली.

टिव्ही मालिकांमधुन श्रीकृष्णाची भूमीका

जन्माष्ठमीचा सोहळा सर्वत्र साजरा होत असताना दूरदर्शनच्या त्या आठवणीतला एक कलाकार आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

 भगवान श्रीकृष्णाच्या लीला केवळ चित्रपटातच नाही तर छोट्या पडद्यावरही दाखवल्या गेल्या. अनेक कलाकारांनी टीव्ही मालिकांमध्ये भगवान कृष्णाची भूमिका साकारली आहे. 

चला आज पाहुया श्रीकृष्णाची भूमीका साकारणाऱ्या त्या कलाकाराला ज्याला आजही त्याच अजरामर व्यक्तिरेखेसाठी ओळखलं जातं.

रामानंद सागर यांचा कृष्णा

रामानंद सागर यांचा 'कृष्णा' अर्थात स्वप्नील जोशी आणि सर्वदमन डी बॅनर्जी अजूनही लोकांना आठवतात. तुम्हाला माहीत आहे का सर्वदमन डी बॅनर्जी आता कुठे आहेत? अजून काय करतायत, चला पाहूया भगवान श्रीकृष्ण सध्या काय करतात?

सर्वदमन मुळचे उत्तरप्रदेशचे

भगवान कृष्णाच्या भूमिकेत सर्वदमन डी. बॅनर्जी यांना लोकांनी खूप प्रेम दिले. या भूमिकेमुळे सर्वदमन इतके लोकप्रिय झाले की आजही लोक त्यांची खऱ्या आयुष्यात पूजा करतात. 

उत्तर प्रदेशातील उन्नावमधील मगरवाडा येथे राहणारे सर्वदमन डी बॅनर्जी यांनी दहावीत असताना अभिनय करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यानंतर त्यांनी त्या दिशेने प्रयत्न करायला सुरूवात केली.

वयाच्या 50 शीपर्यंतच काम करेन

रामानंद सागर यांच्या 'कृष्णा' या मालिकेनंतर सर्वदमन डी. बॅनर्जी अध्यात्माकडे वळले. 'ट्रॅव्हल जुनून'शी झालेल्या संवादात सर्वदमन यांनी सांगितले होते की, 'कृष्णा'मध्ये काम करताना त्यांनी ठरवले होते की, वयाच्या 50 वर्षापर्यंतच काम करायचे. 

काही वर्षानंतर अभिनय सोडून दुसरं काहीतरी करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळेच सर्वदमन डी बॅनर्जी यांनी ग्लॅमरच्या जगाला राम राम ठोकून अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आहे.

गंगेच्या तीरावर ध्यान

सर्वदमन डी बॅनर्जी सध्या ऋषिकेशमध्ये राहतात आणि राजाजी नॅशनल पार्कजवळील लोकांना मोफत योग आणि ध्यान शिकवतात. 

सर्वदमन स्वतः गंगेच्या तीरावर ध्यान करतात. सर्वदमन डी बॅनर्जी यांनी स्वतः सांगितले की ते 24 वर्षांपासून ध्यान करत आहेत.

गरीब मुलांचं शिक्षण

योग आणि ध्यानाव्यतिरिक्त, सर्वदमन डी बॅनर्जी 'पंख' नावाच्या एनजीओला देखील मदत करतात. एनजीओच्या मदतीसाठी ते आर्थिक मदतही करतात.

 ही एनजीओ झोपडपट्टीत राहणाऱ्या उत्तराखंडमधील 200 गरीब मुलांच्या शिक्षणाची काळजी घेत आहे. याशिवाय ही स्वयंसेवी संस्था शोषित महिलांना कौशल्य प्रशिक्षणही देते.

सर्वदमन यांचं लग्न टिकलं नाही

सर्वदमन डी बॅनर्जी यांचा विवाह सुनीता नावाच्या महिलेशी झाला होता. सुनिता पेशाने एक डॉक्टर आहेत. सर्वदमन यांना एक मुलगी आहे आणि तीही डॉक्टर आहे. 

मात्र, सर्वदमन डी बॅनर्जी यांचे लग्न मोडले. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याने आपले लग्न कधीच स्वीकारले नाही. त्याच्या आई-वडिलांचाही कोणावर विश्वास नव्हता.

Lonavala Accident: लोणावळ्यात भीषण अपघात..! अनियंत्रित कारची ट्रकला धडक, गोव्यातल्या दोन पर्यटकांचा जागीच मृत्यू

मुरगावच्या SGPDA मच्छी मार्केटमध्ये प्रचंड अस्वच्छता! डासांची पैदास वाढल्याने स्थानिकांचा संताप

IND vs SA: 'शतकवीर' क्विंटन डी कॉक! टीम इंडियाविरुद्ध 'असा' विक्रम करणारा पहिला आफ्रिकन खेळाडू

Aquem Fire: आके येथील फास्ट फूड सेंटरला मध्यरात्री भीषण आग; 25 लाखांचे नुकसान, आगीचे कारण अस्पष्ट

Goa Politics: ''पाटकरांनी जबाबदारी घेतली नाही'',वीरेश बोरकर यांचा आरोप; काँग्रेसच्या 'उद्या'मुळे युतीचा खेळ खल्लास

SCROLL FOR NEXT