'जवान'ची क्रेझ...चित्रपटाचा पहिला शो पाहिल्यानंतर अभिनेत्रीने लिहिली नोट दिग्दर्शकासोबत फोटो शेअर म्हणाली शाहरुख...

शाहरुख खानचा बहुचर्चित जवान 7 सप्टेंबरला रिलीज झाला आणि पहाटेच्या शो नंतर अभिनेत्री रिद्धी डोगराने पोस्ट शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे.
Jawan Release
Jawan Release Dainik Gomantak

Ridhhi Dogra Viral Photo : गेल्या कित्येक दिवसांपासून चाहत्यांना प्रतिक्षा असणारा शाहरुख खानचा जवान आज अखेर रिलीज झाला आहे.

चित्रपट रिलीज होताच चाहत्यांसोबत सेलिब्रिटीही पहिल्या शो नंतर उत्साहात असल्याचे दिसुन येत आहे.

जवानमध्ये शाहरुखसोबत स्क्रीन शेअर केलेली अभिनेत्री रिद्धी डोगरा सध्या सोशल मिडीयावर एका पोस्टमुळे चर्चेत आहे. रिद्धीने जवानचा दिग्दर्शक अॅटलीसोबत एक फोटो शेअर शाहरुखचं काैतुक करणारी नोट लिहिली आहे.

जवान दाखल

पठानच्या तुफान यशानंतर चाहते शाहरुखच्या जवानची आतुरतेने वाट पाहत होते. शाहरुख खान , नयनतारा आणि विजय सेतुपती स्टारर जवान अखेर आज (7 सप्टेंबर) मोठ्या पडद्यावर दाखल झाला आहे. चित्रपटाच्या पहाटेच्या शोला चाहत्यांनी केलेली गर्दी अवाक करणारी होती. 

चित्रपटाच्या रिलीजचा आनंद साजरा करताना शाहरुखचे चाहते खचाखच भरलेल्या थिएटरमध्ये नाचताना, SRK आणि जवान या नावांसह जल्लोष करताना दिसले. 

चित्रपटात नयनतारा, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, रिद्धी डोगरा या तगड्या अभिनेत्रींचा समावेश आहे. आता, चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत असताना, रिद्धी डोग्राने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर जवानचा दिग्दर्शक ऍटलीसाठी एक नोट लिहिली आहे .

रिद्धीची पोस्ट

रिद्धी डोग्राने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर दिग्दर्शक अॅटलीसोबतचा एक सेल्फी शेअर केला आहे. रिद्धी या फोटोत अॅटलीसोबत पोझ देताना हसताना दिसत आहे.

 तिच्या कॅप्शनमध्ये, सेटवरील अॅटलीचं काम आणि त्याचे सिनेमावरील प्रेम पाहून ती आश्चर्यचकित झाली.

रिद्धीने लिहिले "मी काढलेला एकमेव फोटो. @atlee47 सेटवर तुमची प्रतिभा, कामावरील तुमची विश्वासाची शक्ती आणि सिनेमावरील प्रेम अनुभवण्यात मी खरोखरच धन्य आहे. मी चित्रपट पाहिला. #जवान पाहण्यासाठी जगाची वाट पाहू शकत नाही," . 

शाहरुखचं कौतुक

जवान पाहिल्यानंतर रिद्धी डोगरानेही याला 'शतकातील चित्रपट' म्हटले आहे. तिने शाहरुख खानच्या कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव केला. रिद्धीने शाहरुखचे कौतुक करताना लिहिले

 "मी नुकताच शतकातील चित्रपट पाहिला!!#जवान या क्षणी मला एवढेच सांगायचे आहे की, तुम्ही सर्वजण एका अतुलनीय यशस्वी सिनेमॅटिक युफोरिक अनुभवासाठी तयार आहात!!!!

शाहरुखसोबत अन्य कलाकार

शाहरुख खान, नयनतारा आणि विजय सेतुपती व्यतिरिक्त, जवानमध्ये सान्या मल्होत्रा, प्रियामणी, सुनील ग्रोव्हर, रिद्धी डोग्रा, संजीता भट्टाचार्य, गिरीजा ओक, योगी बाबू आणि इतरांचा समावेश आहे. दीपिका पदुकोणचीही खास भूमिका आहे.

जवान

जवान हा चित्रपट अॅटली दिग्दर्शित रेड चिलीज एंटरटेनमेंट ची निर्मिती, गौरी खान निर्मित आणि गौरव वर्मा सह-निर्मित आहे. हा चित्रपट 7 सप्टेंबर 2023 रोजी जगभरातील थिएटरमध्ये हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com